सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) धोलवड गावचे सुपुत्र, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
धोलवड गावचे सुपुत्र, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील ज्येष्ठ विज्ञान अध्यापक रतीलाल बाबेल यांचा पहिला कविता संग्रह " कविता मुलद्रव्याची "या काव्यसंग्रहाची राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार सातारा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, "मराठी साहित्य मंडळ "यांचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, जेष्ठ लेखक विनायकराव जाधव यांचे हस्ते प्राप्त झाले
या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे ,राष्ट्रीय सरचिटणीस नीलिमा जोशी,जेष्ठ लेखक विनायकराव जाधव आयोजक हेमा जाधव,उद्योजक जयप्रकाश बाबेल, उद्योजक सुहास जाधव,सविता बाबेल,अक्षदा बाबेल आदि मान्यवर उपस्थित होते.
"कविता मूलद्रव्याची" हा कवितासंग्रह महाराष्ट्रातील एक वेगळा प्रयोग असल्याचे मत नाशिक येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर निवास पाटील यांनी व्यक्त केले. जी एम आर टी चे केंद्रसंचालक डॉक्टर यशवंत गुप्ता यांनी हा कवितासंग्रह इंग्रजी व हिंदीत लवकर रूपांतरित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
आवर्तसारणीतील मुलद्रव्यावरील कवितेत, त्याचा उगम, शोध ,भौतिक व रासायनिक गुणधर्म आणि सामाजिक मूल्य मांडण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असल्याचे मत डॉक्टर जे. के. सोळंकी यांनी व्यक्त केले. या कवितासंग्रहाचे कौतुक विज्ञान शिक्षक, लेखक, विद्यार्थी व पालक यांनी केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा कौतुक केले आहे .महाराष्ट्रातील विविध शाळांमधून या कविता पाठ करून घेतल्या आहेत तसेच त्याची प्रिंट करून वर्ग खोल्यांमध्ये लावले आहेत. पुरस्कारात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ देण्यात आले.
COMMENTS