सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इ...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
अभ्यासक्रम निहाय निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
*कॉम्प्युटर इंजिनिअरिंग:*
प्रतीक जाधव-कॅपजेमिनी मध्ये सिस्टीम अनालिस्ट या पदावर वार्षिक ४ लाखाचे पॅकेज
बापू वाळुंज-इन्फोसिस प्रा.इंडिया लि.,मुंबई मध्ये सिस्टीम इंजिनियर या पदावर वार्षिक ३.६ लाखाचे पॅकेज
कावेरी शिंदे-टी सी एस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर वार्षिक ३.५ लाखाचे पॅकेज
*मेकॅनिकल इंजिनिअरिंग* विभागातील नीरज बागडे याची टी सी एस मध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनियर ट्रेनी या पदावर वार्षिक ३.३६ लाखाचे पॅकेज
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग:*
किशोरी गोल्हे-इन्फोसिस प्रा.इंडिया लि.,मुंबई मध्ये सिस्टीम इंजिनियर ट्रेनी या पदावर ३.६ लाखाचे पॅकेज
राहुल जोरी-सिंटेल प्रा.लि.पुणे येथे असोसिएट कन्सल्टंट या पदावर ३.४० लाखाचे पॅकेज
स्नेहा शेटे-टी सी एस मध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या पदावर वार्षिक ३.३६ लाखाचे पॅकेज
सुशांत तांबे-एमफासिस प्रा.लि.पुणे येथे असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर ३.२५ लाखाचे पॅकेज
सागर कांबळे-मितसुबिशी इलेक्ट्रिक लि.पुणे येथे ज्युनियर इंजिनियर या पदावर २.४७ लाखाचे पॅकेज
*सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग:*
शाहरुख सय्यद या विद्यार्थ्याची जेनेसीस इंटरनॅशनल कार्पोरेशन लि.मुंबई या कंपनीमार्फत चेन्नई येथे ट्रेनी इंजिनियर म्हणून तर ओंकार थोरात आणि तन्मय नरवडे यांची दिल्ली येथे सर्व्हेयर म्हणून निवड झाल्याचे प्रा.अमोल भोर यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाखाचे पॅकेज देणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी सांगितले.
सदर विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS