बडनेरा (जि. अमरावती) : बडनेरापासून तीन किलोमीटर अंतरावरच्या पाळा येथील वसुधाताई देशमुख अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला श...
बडनेरा (जि. अमरावती) : बडनेरापासून तीन किलोमीटर अंतरावरच्या पाळा येथील वसुधाताई देशमुख अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला शुल्कासाठी सतत तगादा लावून पेपरपासून वंचित ठेवले.
त्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या पालकांनी तक्रारीत केला.
अनिकेत अशोक निरगुळवार (वय २१, रा. रिधोरा, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर मृत युवकाचे पालक, काही नातेवाईक, विद्यार्थी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बडनेरा ठाण्यावर धडक दिल्याने काही वेळेसाठी वातावरण तापले होते. महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार अनिकेतचे वडील अशोक गुलाबराव निरगुळवार (वय ५२) यांनी बडनेरा पोलिसांत दिली. अनिकेत सदर महाविद्यालयामध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाला शिकत होता. त्याच्या पालकांनी आतापर्यंत महाविद्यालयात जवळपास ५४ हजार रुपये शुल्क भरले होते.
१७ हजार रुपये बाकी होते. वडिलांनी अनिकेतसोबत गुरुवारी सकाळी फोनवरून संपर्क साधला असता त्याचा पेपर होता. फी न भरल्यामुळे त्याला पेपर देण्यापासून रोखले. मुलाला आपण शुक्रवारी पूर्ण उर्वरित फी भरण्याबाबत सांगितले होते. परंतु, अचानक गुरुवारी रात्री अनिकेतने साईनगरजवळच्या अनुराधानगरात भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असे बडनेरा पोलिसांनी कळविल्याचे अशोक निरगुळवार यांनी सांगितले.
पेपर हिसकला नाही
२५ विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत होते. ते शुल्क भरावे, अशा सूचना अनिकेतसोबतच इतरांनाही महाविद्यालयाकडून दिल्या होत्या. गुरुवारी (ता. ३१) सहाव्या सत्राचा प्रॅक्टिकलचा पेपर होता. पेपरनंतर महाविद्यालयात कार्यक्रमसुद्धा झाला. पेपर व नंतर कार्यक्रमाला अनिकेत हजर होता. त्याने इतरांसोबत पेपर दिला. कुण्याही प्राध्यापकाने फीसाठी त्याचा पेपर हिसकला नाही. त्याला परीक्षेपासून वंचित ठेवले नाही. त्यामुळे पालकांनी केलेला आरोप चुकीचा आहे, असे महाविद्यालयाचे प्राध्यापक उदय देशमुख यांनी सांगितले.
Following the principles of traditional European Roulette, the principles of Turbo Roulette on-line are very easy to understand. In order to win a spin players should accurately 배당 토토 predict where the ivory ball will land on the roulette wheel. With 37 potential pockets during which the ball can fall into there are several of} betting variations that you could choose when attempting to foretell where the ball will land.
ReplyDelete