विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या वतीने मंगळवार दि १२ एप्रिल रोजी दहाव...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या वतीने मंगळवार दि १२ एप्रिल रोजी दहावीच्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन व कलमापन चाचणीचे आयोजन सकाळी ठिक ११ वा आयोजित केलेले आहे . या कलचाचणी द्वारे दहावीनंतर विद्यार्थ्याच्या करिअरला योग्य दिशा मिळणार आहे . करिअर निवडताना आवड , क्षमता , पात्रता हे तीन महत्वाचे घटक परिणाम करत असतात .
आपल्या पाल्यांने दहावीची परिक्षा दिल्यानंतर सर्वच पालकांना मुलांच्या करिअरच्या भविष्याची चिंता पडलेली असते . दहावी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जायचे ? की मेडिकलला जायचे ? की स्पर्धा परिक्षामार्फत प्रशासकिय सेवेत जायचं या द्विधा मनःस्थिती विद्यार्थी व पालक असतात . म्हणून आपल्या पाल्याच्या दहावी नंतरच्या करिअर विषयी अनेक प्रश्न , शंका पालकांना भेडसावत असतात . या सर्व प्रश्नांचे निरसन व उत्तरे करिअर मार्गदर्शन व कल चाचणी मध्ये मिळणार आहेत . तसेच सीईटी (CET ), नीट (NEET ) , जेईई मेन्स (JEE Mains ) , जेईई ॲडव्हान्स ( JEE Advanced ) व लोकसेवा आयोग (UPSC ) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC )या सर्वच परिक्षा विषयीच्या शंकाचे निरसन विद्यार्थ्यांना योग्यरीतीने या कलमापन चाचणी व करिअर मार्गदर्शन व्याख्यानांमुळे होणार आहे .
अनेक वेळा ग्रामीण भागातील मुलांकडे गुणवत्ता व कष्ट करण्याची क्षमता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव व चुकीचे अभ्यासतंत्र आणि मनातील न्यूनगंड, अयोग्य नियोजन यामुळे बरेच विद्यार्थी वर्षभर अभ्यास करूनही गुणवत्ता मिळविण्यात अयशस्वी होतात . त्यामुळे सूत्रबद्ध अभ्यासाचे व्यवस्थित तंत्र व योग्य , अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणे ही आता काळाची गरज झाली आहे . त्यासाठी नीट , जेईई या सारख्या राष्ट्रीय पातळी वरील प्रवेश परिक्षांचा तसेच UPSC , MPSC परिक्षांच्या तयारीचा पाया मजबूत कसा करता येईल व कठिण वाटणाऱ्या या सर्वच परिक्षांमध्ये यश कसे मिळविता येईल यासाठी विविध विषयाच्या तज्ञ व अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन आवश्यक असते . म्हणूनच विद्यार्थ्यांना आवड असणाऱ्या विषयांतील मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या तरच कठिण वाटणारा अभ्यास अगदी सोपा होईल . निव्वळ पाठांतर करण्यापेक्षा ती संकल्पना नीट समवून घेण्यावर भर देणे आवश्यकच आहे . सर्वच परिक्षांमध्ये प्रभुत्व कसे मिळविता येईल यासाठी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या वतीने 'करिअर मार्गदर्शन व कलमापन चाचणी ' चे आयोजन करण्यात आलेले आहे .
'दहावीनंतर करिअर मार्गदर्शन व कलमापन चाचणी ' या संदर्भात प्रा .अमोल चंगेडिया व प्रा .चंद्रकांत कांबळे , प्रा . मनिषा कुलकर्णी व प्रा .शरद मनसुख यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे . तरी या करिअर कलमापन चाचणीचा लाभ ग्रामीण भागातील दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपल्या भविष्याचा मार्ग निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी केले आहे . कला , वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये करिअर घडविण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत प्राचार्य डॉ चंद्रकांत मंडलिक यांनी व्यक्त केले . तसेच या कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्या प्रा . प्रतिभा लोढा व पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते यांनी केलेले आहे
चौकटीसाठी
करिअर कलमापन चाचणी विषयी ...
कधी : मंगळवार दि . १२ एप्रिल २०२२
केव्हा : सकाळी . ११ वाजता
कुठे : श्री शिव छत्रपती कॉलेज जुन्नर
प्रमुख वक्ते : प्रा अमोल चंगेडिया , प्रा चंद्रकांत कांबळे व प्रा मनिषा कुलकर्णी ' प्रा शरद मनसुख
प्रवेश : सर्वच विद्यार्थ्यांना विनामूल्य
संपर्क : प्रा . योगेश घोडके मो. नं.9822880809
'
COMMENTS