नांदेड : एका दुचाकीला खासगी बसने धडक दिल्यानंतर गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीमध्ये कैद झाला आहे. मंगळव...
नांदेड : एका दुचाकीला खासगी बसने धडक दिल्यानंतर गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीमध्ये कैद झाला आहे. मंगळवारी (ता. 25 एप्रिल) दुपारी नांदेड शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नांदेडहून त्रिकुटकडे जाणाऱ्या दुचाकीला खाजगी बसने धडक दिली. यावेळी इंदूबाई डांगे (वय २२) या गरोदर महिलेला बसने चिरडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाजी डांगे आणि चंद्रकांत मोरे हे दोघे जण जखमी झाले आहेत. बसने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अपघातानंतर चालकाने पुढे जाऊन बस थांबवली पण तोपर्यंत महिलेचा जागीच जीव गेला होता. रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून होती. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती.
https://twitter.com/ssidsawant/status/1519495047766413312?s=20&t=c4Atlaxdmijk5bAu1qwh5A
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. शिवाय, प्रवासी बसही ताब्यात घेतली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS