पुणे : क्राईम पेट्रोल ही मालिका छोट्या पडद्यावर दाखवली जाते. सदर मालिका ही गुन्ह्याशी संबंधीत सत्य घटनेवर आधारीत कथानकाच्या स्वरुपात तयार के...
पुणे : क्राईम पेट्रोल ही मालिका छोट्या पडद्यावर दाखवली जाते. सदर मालिका ही गुन्ह्याशी संबंधीत सत्य घटनेवर आधारीत कथानकाच्या स्वरुपात तयार केलेली असते. या मालिकेतून प्रेक्षकांनी सकारात्मक बोध घेऊन सावध रहायला हवे.
मात्र काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक या मालिका बघून नकारात्मक बोध घेत त्या धर्तीवर गुन्हे करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पुणे येथे एका प्रियकराने क्राईम पेट्रोल मालिका बघून त्यातील कथानकानुसार आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
किसन सिताराम जगताप (46) रा. बेलसर, नारळीचा मळा, ता. पुरंदर, पुणे असे हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आर्थिक वादातून त्याने त्याच्या प्रेयसीचे भिंतीवर डोके आपटून हत्या केली. या घटनेनंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड आदी चीजवस्तू लंपास करत घरफोडी झाल्याचा देखावा निर्माण केला. मात्र त्याच्यावर संशय बळावल्याने त्याची फेरतपासणी केली असता आपला गुन्हा कबुल केला. क्राईम पेट्रोल मालिका बघून त्यातून या गुन्ह्याची संकल्पना आपण घेतल्याचे त्याने कबुल केले. मयत विवाहीता ही आरोपीची प्रेयसी होती. ती दोघा मुली व जावयासोबत रहात होती. तिचे आरोपीसोबत सुमारे बारा वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ती आरोपीकडे मुलींच्या लग्नासाठी पैसे मागत होती. त्यातून झालेल्या वादातून हा गुन्ह्याचा प्रकार घडला.
COMMENTS