नवी दिल्लीः दिल्ली येथे आठवड्याभरापूर्वी घडलेल्या एका महिलेच्या खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यातला प्रमुख आरोपी तिचा नवराच...
नवी दिल्लीः दिल्ली येथे आठवड्याभरापूर्वी घडलेल्या एका महिलेच्या खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यातला प्रमुख आरोपी तिचा नवराच असल्याचे तपासादरम्यान उघड झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
18 एप्रिल रोजी नरेला परिसरात एका 30 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा शोध घेताना पोलिसांना ती 16 एप्रिल रोजी रात्री अखेरची आपल्या नवऱ्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यांचा संशय पक्का झाला. महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीने दोन लग्न केली होती. त्यापैकी पहिल्या पत्नीसोबत तो दिल्ली येथे राहतो. त्याची दुसरी बायको ही बिहारची होती. ती काही काळापूर्वी त्याच्यासोबत राहायला दिल्ली येथे आली होती. पण त्यांच्यात वाद होऊ लागले. पहिल्या बायकोने दुसऱ्या बायकोचा काटा काढायचा ठरवले.
आरोपी नवऱ्याने मित्राला आपल्या दुसऱ्या बायकोवर बलात्कार करण्यास सांगितले. आरोपीच्या मित्राने त्याच्या बायकोवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या पहिल्या बायकोने तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी आरोपी नवऱ्यासह तीन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS