पुणेः जागेच्या वादातून हॉटेलमालक यास जीवे ठार मारण्याचे प्रयत्न करुन फरारी झालेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प...
पुणेः जागेच्या वादातून हॉटेलमालक यास जीवे ठार मारण्याचे प्रयत्न करुन फरारी झालेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
३०/०३/२०२२ रोजी जंक्शन हॉटेल स्वामीनारायण मंदिरासमोर पुणे याठिकाणी फिर्यादी सिध्दार्थ अनिल कांबळे (वय २८, रा. नऱहे, पुणे) हे त्याचे हॉटेलमध्ये असताना अचानक ओळखीचे संतोष ऊर्फ आप्पा कोळपे, बाबू कोळपे, बंडू कोळपे, बंडु सुरेश कोळपे व त्याचे इतर ५ ते ६ जण यांनी हॉटेलमध्ये आले.
जांभळी नसरापूर येथील प्लॉटमध्ये लक्ष का घालतोस? तेथे लक्ष देवू नको अशी धमकी देवून त्याना जीवे ठार मारण्याचा उददेशाने डोक्यात व शरीरावर हॉकी स्टीकने मारहाण करून त्याचे हॉटेलचे मॅनेजर ज्ञानेश्वर ऐवळे व हॉटेलचे पार्टनर शंकर मुजूमले यांना देखील मारहाण करुन हॉटेलमधील सर्व साहित्याची टेबल खुर्चाची तोडफोड नुकसान करुन पळून गेले होते. त्याच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२२ भादवी कलम ३०७,५०४,५०६,४२७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, मु पो अधि कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी हे फारारी झाले असल्याने त्यांचा तपास चालू असताना पोलिस अंमलदार राहूल तांबे व विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी मा वपोनि यांना कळविली. त्यांनी सदरची बातमी सपोनि वैभव गायकवाड व त्यांचे स्टाफला कळविली असता त्यांनी सापळा लाऊन फरारी झालेले आरोपी १) अभिषेक सुभाष कोळपे (वय २), २) अक्षय दिपक गायकवाड (वय २७), ३) शंकर ऊर्फ बंडू सुरेश कोळपे (वय २९), ४) प्रविण पोपट तिखोळे (वय २९, सर्व रा मु पो जांभळी ता भोर जि पुणे), ५) परशुराम अंकुश कवडे (वय २९, रा शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. दाखल गुन्हयामध्ये सपोनि अशिष कवठेकर यांनी अटक करुन त्याचेकडून गुन्हयात वापरलेले क्रिकेटचा स्टप, दगड त्याचेकडून जप्त करुन त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेतली आहे.
सदरची कामगिरी सागर पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगिता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा.
पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलिस उप निरीक्षक धिरज गुप्ता तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, राहूल तांबे, अभिजीत जाधव ,सचिन गाडे, विक्रम सांवत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS