पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील एका गावातील महिलेशी ओळख वाढवून महिलेच्या घरी येऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार करत महिलेचे अश्लील व्हिडिओ व फ...
पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील एका गावातील महिलेशी ओळख वाढवून महिलेच्या घरी येऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार करत महिलेचे अश्लील व्हिडिओ व फोटो चित्रित केले. महिलेच्या पतीला मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या सचिन प्रयागनारायण कूसवाह याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्रापूर जवळील एका गावातील महिलेची सचिन कूसवाह याच्याशी ओळख झाली होती. दरम्यान सचिन याने महिलेशी ओळख वाढवून वारंवार महिलेच्या घरी येऊ लागला. त्याने वेळोवेळी महिलेशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले, त्यांनतर त्याने महिलेच्या पतीला मारण्याची धमकी देखील देऊन अत्याचार करत महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो देखील काढले. अनेकदा महिलेला सचिन राहत असलेल्या कडाची वाडी येथे बोलवून देत देखील सदर प्रकार केले, तसेच महिलेला वारंवार त्रास देत महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो महिलेच्या मोबाईलवर पाठवून देत धमकी दिली.
घडलेल्या प्रकाराबाबत महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सचिन प्रयागनारायण कूसवाह (रा. कडची वाडी ता. खेड जि. पुणे मूळ रा. इंद्रानगर ता. वरई जि. जालवन उत्तरप्रदेश) या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलिस हवालदार सचिन होळकर हे करत आहेत.
COMMENTS