पुणे: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे एक महिन्यापुर्वी होळीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास बाळू बारहाते (वय ४७) या युवकाचा खून झाला होता. खून कर...
पुणे: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे एक महिन्यापुर्वी होळीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास बाळू बारहाते (वय ४७) या युवकाचा खून झाला होता. खून करून उचाळे वस्ती येथे घोडनदी पात्रात मृतदेह टाकण्यात आला होता.
अतिशय कठीण अशा आडवाटेने जाणारा हा शेतातील रस्ता असल्याने हे ठिकाण माहित असणारी, त्याच परिसरात राहणारी व्यक्ती आरोपी असू शकते असा अंदाज पोलिसांना आला होता.
शर्थीचे प्रयत्न करून पोलिस खात्याने अनेक संशयित व्यक्तींची तपासणी केली होती. परंतु, कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नव्हता. त्यामुळे पोलिस खात्यासमोर या गुन्हयाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. शिरूर पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यातील अधिकारी व पथक अनेक दिवस टाकळी हाजी मध्ये तळ ठोकून होते. परंतू या प्रकरणातील आरोपी भेटत नव्हते.
तब्बल महीनाभरानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी टाकळी हाजी दुरक्षेत्रात यापुर्वी काम करणारे व चांगला जनसंपर्क असणारे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण यांना तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पठाण यांनी या भागात ठाण मांडत कसून तपास सुरू केला. अनेक खबऱ्या मार्फत मागोवा घेतला. अखेर त्यांना त्यांच्या एका खबऱ्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या माहीतीच्या आधारे तात्काळ सुत्रे हालवत आपल्या सहकार्यासमवेत आरोपींच्या मुसक्या आवळन्यात शिरूर पोलिस स्टेशन यांना यश आले आहे.
या खुनप्रकरणी भानुदास वाळुंज (रा. टाकळी हाजी) व अजय मिडगुले (रा. मिडगुलवाडी, कवठे येमाई) यांना अटक केली आहे. या दोघांनी बारहाते याचा खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पण झाले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस ऊपविभागीय आधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले, पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण, पो.कॉ.सुरेश नागलोत यांच्या पथकाने केली केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले हे करत आहेत.
COMMENTS