बुलडाणा : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याच्या घरावर अशाप्रकारे हल्ला करणे हे योग्य नाही...
बुलडाणा : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याच्या घरावर अशाप्रकारे हल्ला करणे हे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे या घटनेचे कदापीही समर्थन करता येणार नाही. अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
अशा घटनांमुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत सामान्य जनतेची सहानुभूती कमी होत आहे. आंदोलनाचे नेतृत्व जर सक्षम नसेल तर अशी परिस्थिती ओढावते. आंदोलन हाताळण्यास सरकार अपयशी ठरले ही गोष्ट खरी आहे. या घटनेमागे नेमके कोण? याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच एस.टी. कर्मचाऱ्यांबाबत सरकारने तात्काळ मध्यमार्ग काढून हा विषय संपविणे अत्यावश्यक झाले आहे.


COMMENTS