सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिसेंट फाऊंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी विशेष उपक्रम. धामणख...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिसेंट फाऊंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी विशेष उपक्रम.
धामणखेल ( ता. जुन्नर ) येथे
डिसेंट फाउंडेशन जुन्नर, पुणे व ग्रामपंचायत धामणखेल यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने किशोरवयीन मुली व माता यांच्यासाठी 'कळी उमलताना' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रिया करडिले बोलत होत्या.
ग्रामीण भागात मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता या विषयावर जास्त स्पष्टपणे बोलले जात नाही. आणि म्हणूनच गेल्या पाच वर्षापासून डिसेंट फाऊंडेशन ही सामाजिक संस्था ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व माता यांना किशोर वयामध्ये मुलींमध्ये होणारे बदल, मासिक पाळी, मानसिक आरोग्य, आहार, व्यायाम तसेच वैयक्तिक स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करत आहे. या उपक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातील पंचवीस महिला वैद्यकीय अधिकारी आपला वेळ देऊन मोफत मार्गदर्शन करत आहेत.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई , धामणखेल गावचे सरपंच संतोष जाधव, प्रकल्प समन्वयक एफ. बी. आतार, ग्रामसेवक विलास वायकर, प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर प्रिया करडीले, अर्चना पवार,सीमा रघतवान ,न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका स्नेहल दाते, शिक्षिका अनिता औटी, आशा साबळे,संतोष पवार,नाडेकर मॅडम,आशा सेविका तनुजा वर्पे, ग्रामपंचायत सदस्या पूजा मडके , अंगणवाडी सेविका सुजाता कोंडे, बारस जाधव, माता पालक व किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मुलींना 'कळी उमलताना' या मार्गदर्शक पुस्तिकेचे तसेच सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले.
स्त्री जन्माचा सन्मान करणाऱ्या सामूहिक प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
COMMENTS