सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच राज...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील विविध विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग नोंदवला.प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.रतिलाल बाबेल व जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभ विद्या विकास मंदिर राजुरी या विद्यालयाचे प्राचार्य जी.के.औटी सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,एमबीए चे प्राचार्य राजीव सावंत,समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण असावा असे प्रा.रतिलाल बाबेल म्हणाले.तसेच विद्यार्थाना डॉ.रघुनाथ माशेलकरांचे पंचसूत्र समजावून सांगितले व ते अंगीकृत करण्याचे आव्हान केले.विद्यार्थ्यानी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी व प्रत्येक वेळी आपल्यामधील उणिवा दुर करून परिपूर्ण बनावे असे प्राचार्य जी.के.औटी सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
पोस्टर सादरीकरण स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक:
निशांत बढे,सुशांत बढे-प्रथम वर्ष मेकाट्रानिक्स इंजिनिअरिंग व अनुजा साबळे- द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
द्वितीय क्रमांक:
श्रावणी येंध्ये(तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) व वेदांत औटी-(तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग)
राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा
सिव्हिल इंजिनीअरिंग
प्रथम क्रमांक
अशपाक मुजावर व सुरज बोरकर-द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
द्वितीय क्रमांक
स्वराज नरवडे व ओम डुंबरे- तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
तृतीय क्रमांक
सुमित रोकडे व मुस्तकीम पटेल-तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
प्रथम क्रमांक
अभिषेक शिंदे- तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
द्वितीय क्रमांक
ऋषिकेश औटी व कुणाल तांबे- द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
तृतीया क्रमांक
प्रवीण घोलप-द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक:
समृद्धी गाडगे- तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
द्वितीय क्रमांक:
सलोनी लेंडे- तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
तृतीय क्रमांक:
आरजू शेख-तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक:
विपुल आग्रे- तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनीअरिंग
द्वितीय क्रमांक:
विकास भोर -तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनीअरिंग
तृतीया क्रमांक:
केशव म्हात्रे -तृतीय वर्ष
मेकॅनिकचल इंजिनीअरिंग
विज्ञान प्रश्नमंजुषा प्रथम वर्ष:
प्रथम क्रमांक
तनुजा थोरात- प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
द्वितीय क्रमांक
सिद्धी डुंबरे -प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व बाळकृष्ण दाते-प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेचे विभागप्रमुख प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.सोपान क्षीरसागर,प्रा.सुनील राहणे,प्रा.विशाल कांबळे,प्रा.श्याम फुलपगारे,प्रा.संदीप त्रिभुवन यांनी नियोजन केले.
राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्ध्येमध्ये प्रा. अमोल खतोडे व प्रा.प्रवीण सातपुते यांनी परिक्षक म्हणून तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा चे विभागीय समन्वयक म्हणून प्रा.हुसेन मोमीन,प्रा.किरण कानडे प्रा.शिल्पा वाजे,घनदाट ए.बी.,भागवत एन. वि.यांनी काम पाहिले.
COMMENTS