पुणेः पत्ता विचारण्याचा बहाणा करुन पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीचे जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱया टोळीला खडक पोलिसांकडून गजाआड करण्यात आले आहे...
पुणेः पत्ता विचारण्याचा बहाणा करुन पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीचे जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱया टोळीला खडक पोलिसांकडून गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९/०३/२०२२ रोजी पहाटे ०३/१५ ते पहाटे ३/३० वा. चे सुमारास टिळक रोड पुणे येथील भारत पेट्रोलियम पेट्रोलपंपाच्या समोर संजय गोविंद मेंगे (रा. शनीवार पेठ पुणे) व त्याच दिवशी अभय बळीराम शिंदे (रा. घोरपडे पेठ पुणे) हे राष्ट्रभुषण चौक पुणे असे पायी चालत जात असतांना दोन दुचाकीवरील चार व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणा करुन दोघांच्या खिशातील जबरदस्तीने एक रिलयमी व एमआय कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट व रोख रक्कम असे एकुण १५,४५०/-रु किंचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व मोटर सायकलवरुन पळुन गेले होते. त्याबाबत खडक पोलिस पोलिस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा उघड करणे बाबत श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलिस निरीक्षक व हर्षवर्धन गाडे पोलिस निरीक्षक गुन्हे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना तपास संदर्भात योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तपास करीत गुन्हयातील संशयीत आरोपींचा तांत्रीक बाबीच्या आधारे जवळपास ७० ते ८० शासकीय व खाजगी सीसीटीव्ही कॅमेरांचे पडताळणी केली असता आरोपी हे जुनी सांगवी व दापोडी पुणे येथील असल्याचा ठावठिकाणा लागल्याने पोलिस अंमलदार संदीप तळेकर व हिंमत होळकर यांनी बातमीदारा मार्फत बातमी काढली. १) राहुल संजय सरोदे (वय १९ वर्षे, रा. एस.टी.कॉलणी, घर नं. ४५, जुनी सांगवी पुणे), २) सुमित भिम सुर्यवंशी (वय १९ वर्षे रा. दापोडी, आत्तार वीटभट्ठी, आबा काटे चाळ, अनाथ आश्रम जवळ पुणे), ३) अंकित सुदाम भालेराव (वय २० वर्षे, रा. दापोडी, आत्तार वीट भट्ठी, आबा काटे चाळ, अनाथ आश्रम जवळ पुणे) व एक अल्पवयीन मुलगा यांना नातुबाग मैदानचे समोर शुक्रवार पेठ पुणे येथे त्यांचेकडील एक लाल रंगाची स्टनर मोटर सायकल व एक लाल रंगाची होन्डा डी.ओ गाडयांसह ताब्यात घेतले. खडक पोलिस ठाणे येथे आणून सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांचेकडुन गुन्हयातील जबरदस्तीने हिसकाविलेला एक रिलयमी व एमआय कंपनीचे व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेल्या मोटर सायकली असा एकुण ६५,४५०/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींनी आणखी अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहे काय याबाबत तपास चालू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास राहुल खंडाळे पोलिस उप निरीक्षक खडक पोलिस ठाणे हे करीत आहेत.
संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ १ व सतिश गोवेकर ,सहा पोलिस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलिस स्टेशनचे श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हर्षवर्धन गाडे पोलिस निरीक्षक (गुन्हे), राहुल खंडाळे, पोलिस उप निरीक्षक व पोलिस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे, हिंमत होळकर, रफिक नदाफ, राहुल मोरे, विशाल जाधव, सागर घाडगे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, महेश पवार यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS