अहमदनगर: एकाने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिघी (ता. श्रीरामपूर) येथे घडली आहे....
अहमदनगर: एकाने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिघी (ता. श्रीरामपूर) येथे घडली आहे. पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घालून ठार केले तर मुलाला झाडाला फाशी देत मारून टाकले.
धक्कादायक म्हणजे दोघांच्याही हत्येचा व्हिडीओ व छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवला व इतरांनाही पाठवला होता.
अक्षदा बलराज कुदळे (वय २८) व शिवतेज बलराज कुदळे (वय साडेचार वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी बलराज दत्तात्रय कुदळे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा माथेफिरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. बलराज हा श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी येथे राहत होता. त्याचे आई-वडिलांशीही वाद होत होते. त्यामुळे पत्नी व मुलाला घेऊन तो दिघी व खैरीनिमगाव शिवारात असणाऱ्या शेतावर राहण्यासाठी गेला.
आर्थिक कारणांवरून त्याचे पत्नीशी अनेकदा वाद होत होते. त्याला कंटाळून पत्नी काही काळ माहेरी निघून गेली होती. रविवारी सकाळी बलराज याने पत्नी काम करत असताना तिच्या डोक्यात कुदळीने घाव घातला. त्यात ती जागीच ठार झाली. यानंतर त्याने मुलगा शिवतेज याला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिला. मुलाचा जीव जाईपर्यंत तो तेथेच थांबून राहिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बलराजला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS