सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि ...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे(बांगरवाडी) या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंडस्ट्रीयल व्हिजिट(शैक्षणिक सहल) राजुरी (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती.
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक आणि समाजाभिमुखता निर्माण होण्यास मदत होते असे फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ.संतोष घुले व डॉ.सुभाष कुंभार म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी तसेच तेथील रुग्णांसाठीच्या विविध तपासण्या,औषधे,शस्त्रक्रिया याबाबतची संपूर्ण माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.परीक्षित टाके यांनी दिली.
फार्मासिस्ट साठी खासगी आणि सरकारी रुग्णालये,आरोग्य केंद्रांमध्ये फार्मासिस्टची नियुक्ती आहे.आरोग्याशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.रुग्णालयातील रुग्णांसाठी डॉक्टरांनी सांगितलेली किंवा लिहून दिलेली औषधे रुग्णांना देणे आणि आरोग्य कार्यक्रम,योजना राबविणे हे त्यांचे मुख्य काम आहे.औषधांचा साठा उपलब्ध आहे याची काळजी घेणे ही देखील त्यांची जबाबदारी असल्याचे डॉ.परीक्षित यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.टाके म्हणाले की,हेल्थकेअर क्षेत्रात फार्मासिस्ट ची भूमिका महत्त्वाची असून करिअरची व्याप्ती उज्ज्वल आहे.फार्मासिस्ट म्हणून,तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालये,नर्सिंग होम,आरोग्य केंद्र,संरक्षण मंत्रालय,आरोग्य संबंधित सरकारी योजना इत्यादी विभागांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असून याशिवाय फार्मासिस्टना खाजगी नर्सिंग होम,हॉस्पिटल आणि दवाखान्यांमध्ये सहज नोकऱ्या मिळू शकतात.
मात्र हे सर्व करत असताना एक फार्मासिस्ट म्हणून इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी आपली नोकरी असेल त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.औषधाविषयी पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.डॉक्टरांनी सांगितलेले औषध समजून घेण्याची क्षमता देखील हवी.
कुठले औषध किती प्रमाणात व कोणत्या परिस्थितीत द्यावे याचे ज्ञान फार्मासिस्ट ला असते.आणि या सर्व बाबींचा विचार करता फार्मासिस्ट म्हणजे मेडिकल क्षेत्रातील देवदूत असल्याचे डॉ.परीक्षित टाके म्हणाले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषधनिर्माता अधिकारी कदम मॅडम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ माळी मॅडम,आरोग्य सेवक बाळू म्हस्के,आरोग्य सेविका फुंदे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.सागर तांबे,प्रा.सोहम घोडके,प्रा.अर्चना कुटे,प्रा.सौरभ धुमणे,प्रा.आसमा शेख आदी उपस्थित होते.
Very good guidance
ReplyDelete