आरोग्य फंडा : थंडी सरल्यानंतर आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. या कडक उन्हात अनेकांना त्वचेचे त्रास होतात. गरम होऊन घामोळ्या येणे, उन्हाने त...
आरोग्य फंडा : थंडी सरल्यानंतर आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. या कडक उन्हात अनेकांना त्वचेचे त्रास होतात. गरम होऊन घामोळ्या येणे, उन्हाने त्वचा लाल पडणे, खाज येणे, त्वचेची आग होणे या आणि अशा समस्या अनेकांना जाणवतात.
आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार या समस्या होत असतात. त्यामुळे यावर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपण उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल.
कोरडी त्वचा :
थंडी प्रमाणे उन्हाळ्यातही आपली त्वचा कोरडी पडते. उष्णतेमुळे होणाऱ्या कोरड्या त्वचेची अनेकांना समस्या असते. अशी कोरडी त्वचा होण्यापासून रोखण्यासाठी उपाय देखील आहेत. अशावेळी उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा. अंघोळ करताना माइल्ड क्लींजरचा वापर करावा. तसेच कडक पाण्याने अंघोळ ना करता कोमट पाण्याचा वापर करावा. आणि आंघोळीनंतर कोरड्या त्वचेवर मॉइस्चराइजर लावल्यास कोरड्या त्वचेचा त्रास होणार नाही.
खाज येणे :
उन्हाळ्यात अनेकांना खाज येण्याची समस्या असते. शरीराला घाम आल्यावर घाम त्वचेमध्ये जमा होऊन ही खाज सुटते. त्यामुळे अंगावर पुरळ येऊन आणखी त्रास होतो आणि त्वचाही लाल होते. अशावेळी जर तुम्ही दिवसभर एसी मध्ये राहत असत तर सकाळी व्यायाम करावा. त्यामुळे घाम निघून जाईल. त्वचा थंड ठेवण्यासाठी सूती आणि ढिल्या कपड्यांचा वावर करावा.
उष्णतेने ऍलर्जी :
अनेकांना उष्णतेने ऍलर्जीची समस्या जाणवते. ज्यामुळे शरीरावर पित्त जाणवू लागते. त्वचाही लाल पडते. त्यामुळे त्वचा उकळणे आणि खाज येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी पात्तळ कपडे, टोपी, छत्री याचा वापर फायदेशीर ठरेल. तसेच ऍलर्जीवरील उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकतात.
The rules and rules could also be} quite related, however the best way|the method in which} they are enforced is a special story completely. 파라오바카라 For example, if a on line casino doesn’t adjust to the rules, some playing authorities may just concern a fine whereas others could revoke the casino’s license outright. How often playing authorities present up for an unscheduled inspection or management may also differ.
ReplyDelete