सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हॉटेल साईश येथे चतुर्थी फिल्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हॉटेल साईश येथे चतुर्थी फिल्म्स द्वारा प्रस्तुती निर्माता निर्देशक गितकार रमेश अल्लाट यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनावर बनविण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार राघोजींची भूमिका साकारणारे मयुरेश महाजन, नायिका २०१९ ची मिस इंडिया अनन्या शिंदे ,सह निर्देशक कृष्णा वैदंडे तसेच सहकलाकार मंदार चौधरी ,राजेंद्र शिंदे ,फर्जंद फेम अमोल इ. कलाकारांसह सह्याद्री तील आदिवासी सामाजिक संघटनांसोबत जुन्नर मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. हा ऐतिहासिक चित्रपट असल्याने कोणताही सामाजिक आक्षेप येऊ नये यासाठीही आदिवासी विचार मंच महाराष्ट्र ,बिरसा ब्रिगेड व अन्य संघटनांसोबत बैठक करण्यात आली राघोजी भांगरे यांचा कार्यकाळ 1805ते 1848 त्यांना ठाणे येथील सेंट्रल जेल मध्ये फासी देण्यात आली सह्याद्री मध्ये शिवाजी राजां नंतर चा खूप मोठा योद्धा ज्याने इंग्रजांना जेरीस आणले होते अनेक लहान मोठ्या लढाया जुन्नर मधील मोठी लढाई भीमाशंकर ची मोठी इंग्रजांबरोबर ची समोरासमोर लढाई अशा अनेक लढाया परंतु हा क्रांतिकारक इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षित राहिला हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून देशासमोर येण्यासाठी हिंदीमध्ये या चित्रपटाची निर्मिती होत आहे राघोजींचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून मध्यप्रदेश गुजरात दादरा नगर हवेली पर्यंत होते, जुन्नर येथे सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी विचार मंचचे कार्यकर्ते राजेश डामसे, प्रदीप पारधी, कैलास सुपे, नवनाथ लहांगे, अॅड यशवंत पारधी ,सोमनाथ मुऱ्हे तर बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी, शुभम भवारी ,शिवाजी मडके, अंकुश असवले उपस्थित होते. चित्रपटाचे नाव *राघोजी भांगरे टायगर ऑफ द डेक्कन* असे नाव जाहीर करण्यात आल, पुढील महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ होणार असल्याचे अल्लाट यांनी सांगितले तर चित्रपटाच्या सर्व टीमचे आदिवासी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन उंडे यांनी केले तर आभार माऊली दाभाडे यांनी मानले.
👌
ReplyDelete