इंजिनिअर निधी पटेल (वय 22) हिच्या हत्येला आठवडा उलटूनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. सुरतमधील गोदावडी गावातील तिच्या घरी ...
इंजिनिअर निधी पटेल (वय 22) हिच्या हत्येला आठवडा उलटूनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. सुरतमधील गोदावडी गावातील तिच्या घरी 24 ऑगस्टच्या सकाळी निधी मृतावस्थेत आढळून आली होती.
या प्रकरणात पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पोलिसांकडून घटनास्थळी आढळलेले बोटांचे ठसे, निधीचे अलीकडील संवाद आणि इतर संभाव्य धाग्यांची तपासणी सुरू आहे. मात्र, आतापर्यंत तपासाला स्पष्ट दिशा मिळालेली नाही.
तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना
मांडवी पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश न आल्याने सुरतचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. सुमारे 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या तपासात सहभागी आहेत. मात्र, SIT च्या तपासाला चार दिवस उलटूनही अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही. त्यामुळे निधीच्या हत्येचे गूढ कायम आहे.
घराच्या गच्चीवर आढळला निधीचा मृतदेह
पोलिसांना या हत्येमागे निधीच्या ओळखीतील व्यक्तीचा हात असण्याचा संशय आहे. कारण घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. घटनेच्या वेळी निधी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील तीर्थयात्रेसाठी बाहेर गेले होते. ते परतल्यानंतर त्यांना घराच्या गच्चीवर निधीचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कथितरित्या शॉर्ट्सच्या नाडीचा वापर करून निधीचा गळा आवळला. याशिवाय मोबाईल चार्जरच्या केबलचाही वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
निधीच्या प्यायव्हेट पार्टच्या आसपास दुखापती आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घराचा मागील दरवाजा उघडा होता, तर पुढील दरवाजा आतून बंद होता. या परिस्थितीमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला असून, घरात जबरदस्तीने प्रवेश न झाल्याने आरोपी निधीच्या परिचयातील असण्याची शक्यता तपासली जात आहे.


COMMENTS