जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा 'पांडुरंग' बनला 'असिस्टंट कमांडंट'; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव! | CrimeNama
Loading ...

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा 'पांडुरंग' बनला 'असिस्टंट कमांडंट'; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव!

कोल्हापूर: "स्वप्नं ती नसतात जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत," डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ह...



कोल्हापूर: "स्वप्नं ती नसतात जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत," डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हे विचार कोल्हापूरच्या एका सुपुत्राने सत्यात उतरवून दाखवले आहेत. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातील रहिवासी असलेल्या पांडुरंग बाबूराव फोंडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC CAPF) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करत 'असिस्टंट कमांडंट' (Assistant Commandant) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल 'सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूट' मध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


पांडुरंग यांचा प्रवास सोपा नव्हता. एका गरीब शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंग यांनी परिस्थितीचे चटके सोसत आपले शिक्षण पूर्ण केले. राधानगरीच्या डोंगराळ भागातून थेट दिल्लीच्या यूपीएससी (UPSC) परीक्षेपर्यंत मारलेली ही मजल थक्क करणारी आहे. त्यांनी देशात २५२ वा रँक (AIR 252) मिळवून आपण केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती पूर्ण करण्याची ताकदही ठेवतो, हे सिद्ध केले आहे. ते आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) 'क्लास वन' अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.


या यशामागे तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर येथील विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि महाज्योती (MAHAJYOTI) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.विशेष म्हणजे पांडुरंग फोंडे हे सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटचे खोत सरांचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवून असिस्टंट कमांडंट पदावर मजल मारल्याचा सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूट परिवाराला विशेष अभिमान आहे.


यावेळी यावेळी संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी त्यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थीही देशाच्या सर्वोच्च स्तरावर झेप घेऊ शकतो.” दिपक खोत, अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, कोल्हापूर यांनी पांडुरंगच्या मेहनतीचे कौतुक करताना "अशाच प्रकारची मेहनत ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास यश नक्कीच मिळते," असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फीया बागवान,संचालिका रेश्मा कातकर,हिंदवी चौगले आदी विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,5017,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1890,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1070,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,405,Maharashtra,2209,Mumbai,547,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2110,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,55,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा 'पांडुरंग' बनला 'असिस्टंट कमांडंट'; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव!
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा 'पांडुरंग' बनला 'असिस्टंट कमांडंट'; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi94cHWSV6GeE48ZTpjWelDbMe5ICJlaVaoUhddpHjyq3GAoThTJ-R1q6O3sIl7ra533sl-1ir-WPebMtWPtBaNMeJ__sHQkRcVx6S-hPaFvQVbMBnkiI3Rvx3RasHagBU7dzh4yHupLU1at1QmQ9wxYTZosQQOt5M5LUUd3V3ztRa3BxShl1sPcRS9WTs/s320/1002600185.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi94cHWSV6GeE48ZTpjWelDbMe5ICJlaVaoUhddpHjyq3GAoThTJ-R1q6O3sIl7ra533sl-1ir-WPebMtWPtBaNMeJ__sHQkRcVx6S-hPaFvQVbMBnkiI3Rvx3RasHagBU7dzh4yHupLU1at1QmQ9wxYTZosQQOt5M5LUUd3V3ztRa3BxShl1sPcRS9WTs/s72-c/1002600185.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_921.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_921.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content