जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पांगरी माथा कुमशेत फाटा परिसरात आरोपी नामे रवी रविराज बन्सी गायकवाड याने त्याचे मालकीचे पिकप वाहन क्रमांक ...
जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पांगरी माथा कुमशेत फाटा परिसरात आरोपी नामे रवी रविराज बन्सी गायकवाड याने त्याचे मालकीचे पिकप वाहन क्रमांक एम एच 14 के क्यू 86 53 हे कोणताही वैद्य परवाना नसताना देखील त्याचा भाऊ नावे सुनील बन्सी गायकवाड राहणार कुसुर या चालवण्यास दिली व त्याने मालाने भरलेली वर नमूद गाडी ही स्वतः कडे कोणताही वैद्य परवाना नसताना भरधाव वेगात चालवून वेडी वाकडी फिरवून स्टंटबाजी करत हयगयीने व अविचाराने सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे व लोकांचे जीवित धोका निर्माण होईल असे बेदरकारपणे गाडी चालवून कृत्य केले आहे व त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले असल्याने जुन्नर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर - 240/2026 भारतीय न्याय संहिता. कलम .281, 125, 3(5) व मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 184 अन्वये नोंद करण्यात आला आहे.
अशाप्रकारे वाहतूक करणाऱ्या चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता स्टंटबाजी केल्यास पोलीस ठाणेकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठांचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना आदेश आहेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा अशा स्टंटबाजावर जुन्नर पोलीस ठाण्याकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई वाहतूक पोलीस शिपाई गणेश शिंदे व पथकाने केलेली आहे.


COMMENTS