राष्ट्रीय कवी,लेखक डाॅ.खंडू रघुनाथ माळवे-खरमा यांच्या "सामाजिक पर्यावरण" या लेखसंग्रहाचे प्रकाशन चौथ्या राज्यस्तरीय श्रावणधारा का...
राष्ट्रीय कवी,लेखक डाॅ.खंडू रघुनाथ माळवे-खरमा यांच्या "सामाजिक पर्यावरण" या लेखसंग्रहाचे प्रकाशन चौथ्या राज्यस्तरीय श्रावणधारा काव्य महोत्सवात रविवार दि.२३ ऑगष्ट २०२६ रोजी,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर ता.जुन्नर जि.पुणे येथे झाले.समारंभाचे स्वागताध्यक्ष म्हणून डाॅ.खं.र.माळवे, उद्घाटक म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्या डाॅ छायाताई तांबे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ कवयित्री शोभाताई गवांदे-कानवडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश सिरसाट,मराठी विभाग प्रमुख डाॅ वसंत गावडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहितशेठ ढमाले, जुन्नर पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वेसर्वा रणजित पवार यांनी केले.श्रावणधारा काव्यमहोत्सव समितीचे डाॅ प्रविण डुंबरे, प्रा सुरेश गे डुंबरे ,प्रा नागेश हुलवळे,उपस्थित होते.संजय गवांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर संस्थेचे अध्यक्ष, प्रकाशक राजेश साबळे ओतूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.



COMMENTS