लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर होते. या कार...
लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हसत हसत मनातील खदखद बोलून दाखवली.
पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत म्हटले की, 'आम्हा दोघांनाही अशी खाती मिळाली, ज्यात फारसं बोलता येत नाही.'
त्या म्हणाल्या, 'आमचे धनूभाऊ म्हणाले त्यांना पारितोषिक मिळाले की आणखी काय मिळालं, त्यांना समाजकल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. ज्यांना बोलताही येत नाही. लोकांना पर्यावरण मंत्रालय समजवता समजवता माझ्या नाकी नऊ येतात.'
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'पण मुंडेसाहेबांची एक शिकवण आहे. जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे.', या संस्कारात आम्ही वाढलो आहोत.
राजकारणातील महिलांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी सांगितले, "आजही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. संविधानाने समानतेचा अधिकार दिला असला, तरी स्त्री-पुरुष भेदाचे राजकारण अजूनही सुरू आहे. त्याचा अधिक त्रास मलाच सहन करावा लागतो," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अंधश्रद्धेपासून दूर राहा
अण्णाभाऊ साठे उन्हात उभे राहिले म्हणून आपण आज सावलीत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर देशाला संविधान दिले असे सांगत पंकजा मुंडे यांनी तरुणांना शिक्षण घेण्याचे, कष्ट करण्याचे आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन केले.


COMMENTS