पुणे | कोरेगाव भीमा येथील अल-अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशनच्या डिलीट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल ...
पुणे | कोरेगाव भीमा येथील अल-अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशनच्या डिलीट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयाचे महत्त्व समजावून देणे तसेच ज्ञानवृद्धीसाठी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ग्रंथालयाचे शैक्षणिक महत्त्व, वाचनाचे फायदे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात ग्रंथालयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत नवले, विभाग प्रमुख सौ.सोनल सातव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा गायकवाड यांनी केले.


COMMENTS