नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं नको तेच, आई-वडिलांचा आरोप कुणावर? | CrimeNama
Loading ...

नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं नको तेच, आई-वडिलांचा आरोप कुणावर?

नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या दीप्ती यादव या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तिन...



नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या दीप्ती यादव या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला.

दीप्ती तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीतील ही घटना आहे.


पंख्याला ओढणीच्या सहाय्याने...


28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त दीप्तीने सकाळीच तिच्या पालकांशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी तिच्या बोलण्यातून कोणत्याही प्रकारचा ताण किंवा अस्वस्थता जाणवली नव्हती. मात्र, काही तासांनंतर हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींना संशय आल्याने त्यांनी वॉर्डनला माहिती दिली. दरवाजा उघडला असता दीप्ती पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. हॉस्टेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

हत्या करुन मृतदेह लटकवला


घटनेची माहिती मिळताच मुंशीगंज पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत आवश्यक पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, दीप्तीच्या पालकांनी या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

मुलीचा चेहराही पाहू दिला नाही


दीप्तीचे वडील कुंवर बख्श यादव आणि आई सुनीता यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. पालकांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तसेच त्यांना मुलीचा चेहराही पाहू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. दीप्ति आत्महत्या करूच शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे आत्महत्येची नोंद केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4998,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1876,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1056,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,400,Maharashtra,2204,Mumbai,547,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2107,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं नको तेच, आई-वडिलांचा आरोप कुणावर?
नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं नको तेच, आई-वडिलांचा आरोप कुणावर?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikI_3sfMzpAQ8QwLa0rQ_qwXkDZNHPFqSQdY33SC-pPjBVlzb4c3p7UwnJz6eYAS_Ubn9ticU7x-cRkX50vXr7Tbs3N_o6-jxNHBbZImKueTORXIrzm2-sKW4x1lQYOMkdlPBgFG7jTVOuD2I7UPnUF3v_kK5xY7ZNsGd0VNya6umwB7vzRWvNJtceyq4/s320/1002646504.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEikI_3sfMzpAQ8QwLa0rQ_qwXkDZNHPFqSQdY33SC-pPjBVlzb4c3p7UwnJz6eYAS_Ubn9ticU7x-cRkX50vXr7Tbs3N_o6-jxNHBbZImKueTORXIrzm2-sKW4x1lQYOMkdlPBgFG7jTVOuD2I7UPnUF3v_kK5xY7ZNsGd0VNya6umwB7vzRWvNJtceyq4/s72-c/1002646504.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_460.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_460.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content