जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस (20 ऑगस्ट) उत्साहात संपन्न झाल्याची माहिती नगदवाडी क...
जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस (20 ऑगस्ट) उत्साहात संपन्न झाल्याची माहिती नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायणगाव ता.जुन्नर येथील माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोवेशन सेंटरचे सचिव व विज्ञान प्रसारक डॉ.रतिलाल बाबेल यांनी नगदवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषयातील अनेक गमती जमती प्रात्यक्षिकद्वारे सांगितल्या.
यावेळी "वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज" या विषयावर डॉ.रतिलाल बाबेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित सर्व मान्यवर,शिक्षक व विद्यार्थी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची शपथ घेतली.
यावेळी डॉ.रतिलाल बाबेल यांनी दैनंदिन जीवनातील अनेक टाकाऊ साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग करून दाखविले.
यावेळी डॉ.रतिलाल बाबर लिखित 'कविता मूलद्रव्याची', 'Elements in Concert व 'वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये कसा विकसित करायचा?' ही पुस्तके शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली.तसेच अचूक उत्तरे देणाऱ्या पार्थ महेंद्र काळे व शरण्या मंगेश कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ.रतिलाल बाबेल यांच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी पुस्तके भेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन नगदवाडी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील पदवीधर शिक्षक मंगेश मेहेर,विद्या वाघ,पंडित चौगुले,निलेश शेलार,आशा आरेकर,उज्वला कांबळे,स्मिता काळे व अशोक गोरडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले व आभार निलेश शेलार यांनी मानले.


COMMENTS