चंद्रपूर येथून नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 20 दिवसांपूर्वी रजिस्टर मॅरेज करणाऱ्या पतीवर पत्नीने लैंगिक अत्याचा...
चंद्रपूर येथून नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 20 दिवसांपूर्वी रजिस्टर मॅरेज करणाऱ्या पतीवर पत्नीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. आरोपी नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला.
त्यानंतर नवराच आपल्या मित्रासोबत स्मशानभूमीजवळ गेला आणि पीडितेसोबत अत्याचार करण्यास सुरूवात केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे वृत्त समोर आले.
नेमकं काय घडलं?
ही घटना चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलीस ठाणे परिसरातील आहे. सलीम शेख (वय 26) याने 6 ऑगस्ट रोजी एका तरुणीशी कोर्ट मॅरिज केले होते. लग्नानंतर दोन्ही कुटुंबातील मंडळी पारंपारिक विवाह करण्याची पूर्वतयारी करत होते. मात्र यादरम्यान नवऱ्याच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण झाला. अशातच आता पत्नी ही आपल्या आईसोबत सध्या राहत आहे.
पत्नीला फोन लावल्यानंतर तिचा फोन सतत व्यस्त असायचा. यानंतर तो पत्नीच्या घरी पोहोचला असता, तेव्हा पत्नी फोनवरच बोलत होती. तेव्हा हसनने पीडितेच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला होता, नंतर फोनवरून संबंधित व्यक्तीशी संवाद साधला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. काही वेळानंतर पत्नी ही जवळच्या एका सिलाई प्रशिक्षणाच्या केंद्रात पोहोचली होती.
पतीसह मित्राने पीडितेवर केले अत्याचार
त्यानंतर आरोपी नवरा हा आपला 19 वर्षीय मित्र कुणाल बोरकरला बाईकवरून शास्त्रीनगर कॉलनीच्या स्मशानभूमीत गेला होता. त्याच ठिकाणी नवऱ्याने पत्नीसोबत अत्याचार केले. तक्रारीनुसार, मित्राला देखील पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास जबरदस्ती केली. या अत्याचारानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. घरी पोहोचल्यानंतर पीडितेनं घटनेची कुटुंबीयांना माहिती दिली होती. कुटुंबीयांसोबत ती दुर्गापूर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यानंतर आरोपी हसन उर्फ अल्ताफ सलीम शेख आणि कुणाल बोरकरला अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम 70 (1) अन्वये या दोन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


COMMENTS