छत्रपती संभाजी नगर : महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ तारखेच्या सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्...
छत्रपती संभाजी नगर : महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ तारखेच्या सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे रमणी प्रेझेंट्स (पुणे), कवी आकाशआप्पा सोनवणे निर्मित "देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये?" हा वैचारिक कवितांचा जलसा आणि 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' हा एकपात्री प्रयोग मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी सुमेध वंदना मधुकर सोनावणे यांच्या 'च' चळवळीचा या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली तर इतर सहभागी कवी आणि कवयित्रींच्या कवितेने सुद्धा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्वच कविता ताकदीच्या झाल्या. श्रोत्यांनी प्रत्येक कवितेला दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
या वैचारिक कविसंमेलनात प्रा. रमणी बबिता आकाश, श्रेया वाघ, अनिशा दोडके, जित्या जाली, किरण प्रकाश, स्वराज समदूर, विजय लोखंडे, प्रशिक तायडे, किशोर चक्रनारायण, सुमेध वंदना मधुकर सोनावणे, सुभाष गवळी आणि शुभम आव्हाळे यांनी आपल्या कविता सादर केल्या. एकंदरीत सर्वच कवी, कवयित्री यांनी आपल्या कवितांमधून समाजाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश दिला.
कविसंमेलन झाल्यावर 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' हा एकपात्री प्रयोग प्रा. रमणी बबिता आकाश यांची सादर केला. त्यांनी सादर केलेली रमाई ऐकताना संपूर्ण श्रोतावर्ग भावूक झालेला. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांनी हे कविसंमेलन आणि 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' हा केवळ प्रयोग नसून वैचारिक प्रबोधन असल्याचे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ख्यातनाम साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजयकुमार गवई, ॲड. एस. आर. बोडदे, प्राचार्य सुनिल वाकेकर, प्राचार्य डॉ. यशवंत खडसे, डॉ धनराज गोंडाने, स. सो. खंडाळकर, रतनकुमार साळवे, ॲड. जे.के. नारायणे, व्ही.के. वाघ यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवतीला गवंदे, राजकन्या गोंडाणे, डॉ. वंदना पाटील, शारदा पगारे रत्नकला बनसोडे, संघमित्रा खंडाळकर, सविता अभ्यंकर, सरला सदावर्ते, गंगाबाई सुरडकर आदींनी परिश्रम घेतले.


COMMENTS