जुन्नर तालुक्यातील 103 वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्ष 2025/26 मध्ये 3 कोटी 78 ल...
जुन्नर तालुक्यातील 103 वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्ष 2025/26 मध्ये 3 कोटी 78 लक्ष 10 हजार रुपये इतका उच्चांकी नफा झाल्याची माहिती संस्थेचे सभापती सचिन मुळे यांनी दिली. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव ता.जुन्नर येथे निलायम गार्डन मंगल कार्यालयात संपन्न झाली.या सभेमध्ये संस्था व सभासद हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.सर्वसाधारण कर्ज मर्यादा 40 लक्ष रुपये,सभासद मृत्यू मदत निधी 35 लक्ष रुपये,आकस्मिक कर्ज 1 लक्ष रुपये,वैद्यकीय मदत निधी 75 हजार रुपये यासारखे ठराव मंजूर करण्यात आले.संस्था स्वभांडवलावर व्यवसाय करत असून 8.60 % दराने कर्ज वाटप करत असून 8.40% दराने मुदत ठेवी स्वीकारत आहे.संस्थेचे वसूल भाग भांडवल 40 कोटी रुपये असून सभासद संख्या 1082 आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पहिल्या सत्रात केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या शिक्षकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक,इस्रो-नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक,विविध पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांचा,विविध पुरस्कार प्राप्त शाळांचा तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे,जि.प.सदस्य गुलाबशेठ पारखे,माईताई लांडे,पंचायत समिती सभापती कमलताई शेळकंदे,उपसभापती अमित ढोले,शिवसेना तालुकाप्रमुख बाबुभाऊ पाटे,पं.स.सदस्य संभाजीशेठ चव्हाण,जयश्रीताई बनकर,सुषमाताई वाव्हळ, संजयशेठ व-हाडी,जुन्नर शहर नगराध्यक्षा सुजाताताई काजळे,मधुकर काजळे,शिक्षक संघटनांचे पदाधिकारी राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,विकास मटाले,भरत बोचरे,रामदास संभेराव,तालुका अध्यक्ष वैभव सदाकाळ,रमाकांत कवडे,उपेंद्र डुंबरे,सत्यवान मस्के,सुभाष मोहरे,बाळासाहेब लांघी, चंद्रकांत डोके,मधुकर आढारी, राजेश दुरगुडे,मोहन नाडेकर, रविंद्र डुंबरे,रियाज मोमीन, शांताराम डोंगरे,प्रविण घोलप,कमलाकांत मुंढे,वैशाली कुऱ्हाडे,राजश्री डोंगरे,नयना आर्वीकर,सुरेखा बटवाल,पूनम जाधव आदि मान्यवर पदाधिकारी व सभासद शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासदांबरोबरच त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारी ही पतसंस्था नक्कीच इतर पतसंस्थांसाठी आदर्श पतसंस्था असल्याचे मत आमदार शरददादा सोनवणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संतोष पाडेकर,सुनीता वामन,अनिल कुटे,सचिव जितेंद्र मोरे यांनी केले तर नियोजन उपसभापती सविता कु-हाडे,खजिनदार सुभाष दाते,विजय लोखंडे रवींद्र वाजगे,अंबादास वामन, नानाभाऊ कणसे,दिलीप लोहकरे,अविनाश शिंगोटे,पुनम तांबे,दत्तात्रय घोडे,ज्ञानदेव गवारी,सहचिटणीस दत्तात्रय हांडे यांनी केले.आभार संस्थेचे सरचिटणीस उमेश शिंदे यांनी मानले.



COMMENTS