पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्. | CrimeNama
Loading ...

पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्.

पुणेः शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर, पतीने स्वतःवर गोळी झाडून घ...



पुणेः शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर, पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, पतीने खरोखरच स्वत:वर गोळी झाडून घेतली का, याबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे या घटनेचा खोलवर तपास चालू आहे,.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की, दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नीने पतीला कथितरित्या 'स्वतःला गोळी मार' असे सांगितल्याची, तर पतीने पत्नीला 'मलाच गोळी मार' असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. जखमी पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पत्नीही रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते. तिची चौकशी झाल्यानंतर या घटनेचा अधिकचा तपशील प्राप्त होण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. पती-पत्नीमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, गोळी कोणी झाडली, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते आणि गोळीबार नेमका कसा झाला, याचा फरासखाना पोलीस तपास करत आहेत. सध्या पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढील तपासातून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,5014,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1888,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1069,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,404,Maharashtra,2208,Mumbai,547,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2110,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्.
पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMpU-tzN9y28aJwUQv3-GUJZHCn9v-xXURoDpjqZVAuGs7Hip3hRBXL1wIYRJ5Ly_wN3q7p83a_5AkKgq8dy0rWxXYKtW_ETzvZ_30kjEoIcWJwZRlD6jkx_kMr97YYY46krMmQBuwvPazl0d-OLtpVcu0vy11pYCm_MC77DXmK3GUpcoJ6T9KfEO08fU/s320/1002627977.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMpU-tzN9y28aJwUQv3-GUJZHCn9v-xXURoDpjqZVAuGs7Hip3hRBXL1wIYRJ5Ly_wN3q7p83a_5AkKgq8dy0rWxXYKtW_ETzvZ_30kjEoIcWJwZRlD6jkx_kMr97YYY46krMmQBuwvPazl0d-OLtpVcu0vy11pYCm_MC77DXmK3GUpcoJ6T9KfEO08fU/s72-c/1002627977.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_172.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_172.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content