नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या वडिलांसह एका नातेवाईकाविरुद...
नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या वडिलांसह एका नातेवाईकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईला समजलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने आरोप केला आहे की, ती लहान असताना तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चुकीचे वर्तन करून तिचे लैंगिक शोषण केले होते. ही गंभीर बाब जेव्हा मुलीच्या आईच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी पोटच्या मुलीचे रक्षण करण्याऐवजी तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी पाठवून दिले.
पुजाऱ्यानेही केले अत्याचार
नातेवाईकाच्या घरी आश्रयाला गेलेल्या मुलीच्या नशिबी दुर्दैव पाठ सोडत नव्हते. नातेवाईकाच्या घरी राहत असताना तिथे येणाऱ्या एका पुजाऱ्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे. एकापाठोपाठ एका अशा दोन नराधमांच्या कृत्यामुळे मुलीवर मोठा मानसिक आघात झाला आहे.
पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुलीने दिलेल्या सविस्तर जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 75(2) आणि 65(2) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 4, 8 आणि 10 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


COMMENTS