विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे संस्थेचे अध...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे संस्थेचे अध्यक्ष ॲड संजयराव शिवाजीराव काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री निवृत्तीशेठ काळे , संस्थेचे विश्वस्त ॲड अविनाश थोरवे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे, रजिस्टार सौ मनिषा कोरे, एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ बाबासाहेब माने,पर्यवेक्षक प्रा समिर श्रीमंते, एम.सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा कुंडलिक नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड संजयराव शिवाजीराव काळे यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आदराचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेपासून ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी, हुतात्म्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्व ज्ञात-अज्ञात राष्ट्रवीरांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो.
येणाऱ्या काळात आपला देश अधिक सक्षम, समृद्ध आणि स्वावलंबी व्हावा, यासाठी आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प करूया. "माझा देश, माझी जबाबदारी" ही भावना उराशी बाळगून पुढे जाऊया. माझ्या महाविद्यालयातील सर्व स्टाफ, एन सी सी , एन एस एस , इतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित झेंड्याला सलामी देण्यात आली. यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर परेड केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी ,सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एनसीसी विभाग प्रमुख प्रा.डॉ. कॅप्टन बाबासोहब माने यांनी केले.





COMMENTS