नारायणगाव | नगदवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची ...
नारायणगाव | नगदवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली. यावेळी गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी संगीत कवायतीचे सादरीकरण केले. यावेळी १७ विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे देऊन तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी,इस्रो व नासा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि इ.१ली ते १० वी मध्ये प्रथम ५ क्रमांक मिळवणारे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी,मेडल व रोख रक्कमेची पाकिटे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कांदळी गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ.पल्लवी भोर,माजी आदर्श शिक्षणप्रेमी सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बढे,तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,केंद्रप्रमुख वनिता हांडे,केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे,न्यू स्कूलचे मुख्याध्यापक दिपक घाडगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,कृष्णा बढे,नंदा बढे,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,उपाध्यक्ष भावना बढे,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे,उपाध्यक्ष शिवशंकर मांडे,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष संदिप बढे, उपाध्यक्ष सतिश बढे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शाळा सल्लागार समिती सदस्य,माजी विद्यार्थी संघ सर्व सदस्य व गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,पालक व ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कांदळी गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ.पल्लवी भोर व कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ बढे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे,किशोर घाडगे दिनेश घाडगे,संदीप बढे,सुरेश बढे,दिलीप बढे,दिनेश बढे,विकास बढे,गणेश कुतळ,रघुनाथ बढे,रविंद्र काळे,शेखर नायडू,संपत बढे,संतोष बढे,गणेश बढे आदींचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांना दर्जेदार ड्रायफ्रूट चिक्की,केळी व बिस्कीट पुडे खाऊ स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,आशा आरेकर,उज्वला कांबळे,दिलीप तोतरे,राजेश जाधव,संगिता गाडेकर,संतोष चासकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक घाडगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर व दिलीप तोतरे यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.


COMMENTS