विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर - श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे मंगळवार दिनांक ११ /०८ /२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महा...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर - श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे मंगळवार दिनांक ११ /०८ /२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जुन्नर,आरोग्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये ६० विद्यार्थिनींची रक्त चाचणी करून सीबीसी, हिप-बी, कॅल्शियम यासारख्या चाचण्या छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्या. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बी वाघमारे यांनी केले.उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व विशद केले. तेलकट व मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी आरोग्य दूत म्हणून पुढे यावे असेही आवाहन केले.
या शिबिरासाठी श्री मंगेश साबळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कु.साक्षी घुले व चैत्राली शेळके इन्चार्ज सिस्टर उपस्थित होते.वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रीधर सारोक्ते व उपाधीक्षक डॉ.योगेश आगम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले .
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा . ॲड.संजयराव शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी यांनी आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख डॉ.अभिजित पाटील,कॉमर्स विभाग प्रमुख डॉ.सतीश जाधव, प्रा.डॉ.महेंद्र कोरडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभाग प्रमुख प्रा.राहुल सहाणे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा.संतोष गवळी यांनी केले.


COMMENTS