पुणे | कोरेगाव भीमा येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीतील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम ...
पुणे | कोरेगाव भीमा येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीतील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाचा निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत नुकताच जाहीर करण्यात आला. यावर्षीचा निकाल 98 टक्के लागला असून गायत्री वाडेकर (CGPA 8.50) हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच प्रियंका कोंडे (CGPA 8.43) व मानसी जाधव (CGPA 8.38) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
सुप्रिया वाबळे (CGPA 8.36) व गौरी नरवडे (CGPA 8.23) यांनीही चांगले गुण मिळवून फार्मसी कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. संस्थेचे अध्यक्ष श्री नासिर शेख, सहसचिव अँड.जाहीद शेख, संस्थेचे सीईओ श्री. अमीर इनामदार व प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.


COMMENTS