डॉक्टरांच्या पॅनेलसमोर मला कपडे काढून... अनया बांगर काय म्हणाली.पहा..! | CrimeNama
Loading ...

डॉक्टरांच्या पॅनेलसमोर मला कपडे काढून... अनया बांगर काय म्हणाली.पहा..!

  भारताचा माजी भारतीय क्रिकेटर आणि प्रशिक्षक संजय बांगरची कन्या, अनाया बांगरने कायदेशीर लिंगबदल शस्रक्रियेनंतर एक औपचारिक प्रक्रिया नुकतीच प...

 


भारताचा माजी भारतीय क्रिकेटर आणि प्रशिक्षक संजय बांगरची कन्या, अनाया बांगरने कायदेशीर लिंगबदल शस्रक्रियेनंतर एक औपचारिक प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. लिंग मान्यतेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अनायाने 'ट्रान्सजेंडर पडताळणी' (transgender verification) पूर्ण केली.मात्र या पडताळणीच अत्यंत वैयक्तिक आणि तितकाच धक्कादायक अनुभव तिने सांगितला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अनायाने या वैद्यकीय तपासणीचा उल्लेख 'खासगी आयुष्यात अति-हस्तक्षेप करणारी' प्रक्रिया असा केला आहे. या पडताळणीनंतर आपल्याला फारच असुरक्षित आणि एक्सपोज झाल्यासारखे वाटत असल्याचंही अनयाने म्हटलं आहे.


संपूर्ण शारीरिक तपासणी


अनायाने 'ट्रान्सजेंडर पडताळणी' प्रक्रिया नेमकी काय असते हे इतरांना समजावं म्हणून आपण हा व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये अनायाने, "ट्रान्सजेंडरविषयक कायद्यात अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीनंतर मला सरकारी रुग्णालयातील एका वैद्यकीय समितीसमोर हजर राहावे लागले. या तपासणीमध्ये अनेक डॉक्टरांच्या उपस्थितीत माझी संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली," असं म्हटलं आहे.


कपडे काढण्यास सांगितलं


नेमके काय घडले हे ही अनायाने अगदी सविस्तरपणे सांगितले आहे. "अलीकडेच मंजूर झालेल्या ट्रान्सजेंडर कायद्यामुळे आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मला सरकारी रुग्णालयातील एका वैद्यकीय समितीसमोर उभे राहावे लागले. डॉक्टरांनी भरलेल्या एका खोलीत, ज्यात पुरुषांचाही समावेश होता अशा पॅनलमसमोर मला माझ्या अंगावरील कपडे काढण्यास सांगण्यात आलं. माझ्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घेण्यास सांगण्यात आले. या तपासणीचा एक भाग म्हणून स्त्रीरोगविषयक तपासणीही करण्यात आली, जी अत्यंत खाजगी आणि संवेदनशील स्वरूपाची प्रक्रिया होती. हा सारा प्रकार खासगी आयुष्यात अति-हस्तक्षेप करणारा होता," असं अनायाने म्हटलं आहे.हा संपूर्ण अनुभव अत्यंत अस्वस्थ करणारा


'ट्रान्सजेंडर पडताळणी'च्या या अनुभवाचा मनावर परिणाम झाल्याचं सांगताना अनायाने, "मला आठवते की तिथे पडून असताना मी विचार करत होते-कागदोपत्री माझी खरी ओळख सिद्ध करण्यासाठी मला माझ्या शरीराचे प्रदर्शन का करावे लागत आहे? हा संपूर्ण अनुभव अत्यंत अस्वस्थ करणारा होता आणि मला एकाच वेळी खूप असुरक्षित आणि उघडे पडल्यासारखे वाटले," असं व्हिडीओत म्हटलं आहे.


मी हे शेअर करत आहे कारण...


"कायदेशीर मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण या कठीण अनुभवाबद्दल जाहीरपणे बोलण्याचे मी ठरवले," असे अनायाने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. "मी हे शेअर करत आहे कारण या प्रक्रियेत नेमके काय समाविष्ट असू शकते हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही; आणि मला आशा आहे की आपण सर्वजण या गोष्टीशी सहमत असू की कायदेशीर मान्यतेमुळे लोकांच्या प्रतिष्ठेचा आदर राखला गेला पाहिजे," असेही अनायाने आवर्जून नमूद केले आहे.वर्षाच्या सुरुवातीलाच घेतलीये ट्रीटमेंट


या वर्षाच्या सुरुवातीला, अनायावर 'जेंडर-अफरमिंग व्हॅजिनोप्लास्टी' म्हणजेच साध्या शब्दांमध्ये सांगाचे झाले तर लिंग-पुष्टीकरण करणारी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ती तिच्या प्रकृतीतील सुधारणेसंदर्भातील माहिती शेअर करत आहे. त्याचवेळी अनाया ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क व समावेशकतेसाठी आवाज उठवत आहे.


ट्रान्सजेंडर पडताळणी प्रक्रिया काय आहे?


'ट्रान्सजेंडर पर्सन (हक्कांचे संरक्षण) सुधारणा कायदा' अंतर्गत, ज्या व्यक्तींना त्यांच्या लिंग-ओळखीसंदर्भात कायदेशीर मान्यता हवी आहे, त्यांना प्रमाणन प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य-नियुक्त वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून घ्यावी लागू शकते. 'मेडिकल बोर्ड सर्टिफिकेशन' किंवा 'राज्य पडताळणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेचा उद्देश अधिकृत कागदपत्रांसाठी अर्जदाराच्या लिंग-ओळखीची पडताळणी करण्याचा आहे.


COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: डॉक्टरांच्या पॅनेलसमोर मला कपडे काढून... अनया बांगर काय म्हणाली.पहा..!
डॉक्टरांच्या पॅनेलसमोर मला कपडे काढून... अनया बांगर काय म्हणाली.पहा..!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzYsTgV7RQnLKqVDBmkTeoHs4ylh_ZdcyNrRdTSRwg7VOpgYJrIKLgGrMRciVlmZ36SjKaquumXLhtF6l0XOwmI20locVIuy8rTO-as-SnNPmWCjO9Ed2XvAk3vorcfgpjymDAvwsbU-ymYQKvDesqzaGFAsJJjWsEiFTBJDki6f29pVgh3t6_ogp0DxI/s320/IMG_20260707_140659.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzYsTgV7RQnLKqVDBmkTeoHs4ylh_ZdcyNrRdTSRwg7VOpgYJrIKLgGrMRciVlmZ36SjKaquumXLhtF6l0XOwmI20locVIuy8rTO-as-SnNPmWCjO9Ed2XvAk3vorcfgpjymDAvwsbU-ymYQKvDesqzaGFAsJJjWsEiFTBJDki6f29pVgh3t6_ogp0DxI/s72-c/IMG_20260707_140659.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/video_0713859215.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/video_0713859215.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content