वर्गशिक्षिका बाहेर गेल्यानंतर वर्गात अनपेक्षित प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेची सर्वत्र चर्चा सुरू...
वर्गशिक्षिका बाहेर गेल्यानंतर वर्गात अनपेक्षित प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनाैमधून एक हैराण करणारा व्हिडिओअलिकडे खूप जास्त व्हायरल होत आहे. येथील एका शाळेत ५ वर्षांच्या चिमुकल्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. ही मारामारी इतकी भीषण होती की त्याचे फुटेज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये क्लास टीचर मुलांना काहीवेळ एकटे सोडून क्लाबाहेर जाते, ज्यानंतर हा प्रकार घडतो. ही हाणामारी वर्गातील क्लास माॅनिटर आणि एका विद्यार्थ्यामध्ये होते. वर्गमाॅनिटर मुलाला इतक्या जोरात मारत राहते की त्याचा चेहरा सूजून जातो. व्हिडिओत याचे दृष्य स्पष्ट पाहता येते. मुलगी कसलाही विचार न करता मुलाला थप्पड मारते. डोकं पकडते आणि मग पुन्हा एकामागून एक थप्पडांचा वर्षाव करु लागते. चला घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही लखनाैमधील एका शाळेत घडल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी ही घटना घडली ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. यावेळी क्लासरुममध्ये एकूण १८ मुलं उपस्थित होती. शिक्षकेने मुलांना डोकं खाली करुन गप्प बसायला सांगितले आणि ती क्लासरुममध्ये बाहेर पडली. शिक्षिका वर्गातून गेल्यानंतर माॅनिटर वर्गात लक्ष ठेवू लागते. कोणत्या विद्यार्थ्याने आपली मान वर केली की माॅनिटर त्याला मारहाण करु लागते. यादरम्यानच एका विद्यार्थ्यावर ती जोरदार हल्ला करतो आणि डोकं पकडून ती त्याला एकामागून एक अनेक कानशिलात बजावते.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, माॅनिटर मुलगी पहिल्या रांगेत बसलेल्या मुलाला वाईटरित्या मारते. साधारण १० मिनिटांनी जेव्हा वर्गशिक्षिका क्लासरुममध्ये परतल्यानंतर या घटनेला पूर्णविराम मिळाल. मुलगा घरी पोहचल्यानंतर त्याने कुटुंबियांना ही बाब सांगितली ज्यानंतर घटना प्रकाशात आली. क्लासरुमचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटेननंतर माॅनिटरवर कारवाई करत तिला शाळेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मुलीवर कारवाई होण्याची मागणी केली तर वर्गशिक्षकांचीही यात चुकी असल्याचे काहींनी म्हटले. व्हिडिओ @TheStatesmanLtd नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "'५ वर्षांच्या मुलांमध्ये इतका आक्रमकपणा चिंताजनक आहे", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "पण तिने त्याला इतकं का मारलं?", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "बापरे आताची पिढी जरा जास्तच रागीट आहे".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.


COMMENTS