लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद | CrimeNama
Loading ...

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

  श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद इंग्लंडने टीम इंडियाला चारली धूळ इंग्लंडविरुद्धच्या ...

 


श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

इंग्लंडने टीम इंडियाला चारली धूळ

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारताला दारुण पराभव पत्करावा लागयजमान इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंडला ५ सामन्याच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी मिळाली. इंग्लंडने प्रथम फंलदाजी करत २०१ धावांचा डोंगर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. जो टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघावर यापूर्वी कधीही लागला नव्हता.


इंग्लंडने टीम इंडियाला चारली धूळ


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात संथ झाली. अर्शदीप सिंगने एकही धाव न देता षटक टाकले आणि फिल सॉल्टला पूर्णपणे रोखून धरले. मात्र, दुसऱ्या टोकाकडून जॉस बटलरने झटपट ३६ धावा केल्या, पण युवा प्रिन्स यादवने अचूक यॉर्कर टाकून त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रिन्सने हॅरी ब्रुकला बाद केले. यानंतर,फिल सॉल्टने ताबडतोब फलंदाजी करत आणि ४४ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. सॅम करनने अखेरीस २४ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावांची वेगवान खेळी करून इंग्लंडला २०१ धावांच्या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.२०२ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. जोफ्रा आर्चरच्या वेगामुळे आणि जोश टंगच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे संपूर्ण भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.


अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ विजयासाठी आतुर


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सुमारे १९० धावा केल्या होत्या. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, पण इंग्लंडने दुसरा सामना सहज जिंकला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने २०० हून अधिक धावा केल्या पण संपूर्ण संघ केवळ ७६ धावाच करू शकला आणि ११.४ षटकांत सर्वबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही भारतीय संघ सलग पाच सामने गमावलेले नाही.


टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा सर्वात मोठा पराभव

इंग्लंडकडून १२५ धावांनी पराभव (नॉटिंगहॅम, २०२६)

न्यूझीलंडकडून ८० धावांनी पराभव (वेलिंग्टन, २०१९)

दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव (अहमदाबाद, २०२६)

दक्षिण आफ्रिकेकडून ५१ धावांनी पराभव (चंदीगड, २०२५)

न्यूझीलंडकडून ५० धावांनी पराभव (विशाखापट्टणम, २०२६)

भारतीय संघाला सलग ५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

आयर्लंडपासून सुरू झालली पराभवाची मालिका


पराभवांची ही मालिका आयर्लंडविरुद्धच्या मालिकेने सुरू झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंडचा दौरा केला. ते किमान मालिका तरी जिंकतील अशी मोठी अपेक्षा होती, पण त्यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात संघ अत्यंत सावधगिरीने मैदानात उतरला, पण निकाल अनपेक्षित होता. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका आधीच गमावली होती. त्यानंतर, जेव्हा इंग्लंड मालिका सुरू झाली, तेव्हा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातही सलग पराभव झाले. एकंदरीत, आता श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर आणि भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद
लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgL20cJJ-_cQwighIqbAbNmZc9aTCzdkO383TbfXguSyCU5rvoR2BAH2w8yA80c8PphJYXS4m7UrcqHaBrTBwxZjiDVC2laGN9bdSDXfmtfhlqFnYly-BbzTqKiF71jyrn23lufi8McPOSA0OtLf1DC7T8-ONoBKjlD-pWT32TXBQg-5SOS1ZU5bxMiwS4/s320/n71886401317835031380215cb2b3c96e895e5d86e0b306a8bbd582432cae953f46cfc999edf41c2d2a4c72.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgL20cJJ-_cQwighIqbAbNmZc9aTCzdkO383TbfXguSyCU5rvoR2BAH2w8yA80c8PphJYXS4m7UrcqHaBrTBwxZjiDVC2laGN9bdSDXfmtfhlqFnYly-BbzTqKiF71jyrn23lufi8McPOSA0OtLf1DC7T8-ONoBKjlD-pWT32TXBQg-5SOS1ZU5bxMiwS4/s72-c/n71886401317835031380215cb2b3c96e895e5d86e0b306a8bbd582432cae953f46cfc999edf41c2d2a4c72.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/shreyas-iyer-team-india.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/shreyas-iyer-team-india.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content