बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक...
बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असून दुसरा आरोपी मारुती करे हा मुंबई बँड पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रकरण नेमके काय?
आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देतो, असे आमिष दाखवून पोलिसांनी पीडितेवर अत्याचार केला.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संबंधित पीडीतेने पोलिसात धाव घेतली होती मात्र त्या ठिकाणी दाद न मिळाल्याने संबंधित पीडिता न्यायालयात गेली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रोसिटी) गुन्हा नोंदवण्यात आलाय.गंभीर गुन्हा असताना पोलीस प्रशासन आरोपींना अटक करीत नसल्याचा आरोप करीत पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पीडितेने सांगितले.


COMMENTS