पांड्या स्टोअर’ आणि ”काशीबाई बाजीराव बल्लाल’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखला जाणारा टीव्ही अभिनेता रोहित चंडेल याला एका १६ वर्षीय...
पांड्या स्टोअर’ आणि ”काशीबाई बाजीराव बल्लाल’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखला जाणारा टीव्ही अभिनेता रोहित चंडेल याला एका १६ वर्षीय मुलीचा पाठलाग करणे, तिला वारंवार फोन करणे, तिचा छळ करणे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, घाटकोपर पोलिसांनी पुष्टी केली आहे की, रोहित चंडेलने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
रोहित चंडेलला शुक्रवार, १० जुलै रोजी अटक करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याची चौकशी केली. अभिनेत्यावर स्वतःच्या फोन नंबरवरून आणि इतर नंबरवरून मुलीला वारंवार फोन केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी त्याने तिला तिच्या इमारतीजवळ थांबवले आणि तिच्याशी वाद घातला, त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर हल्ला केला. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ७८, ११५(२), ३५२ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल लक्ष्मण अर्देकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला या प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले, “त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले. तो त्या मुलीचा पाठलाग करत होता. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तो तिला भेटायला जात असे हे त्याने कबूल केले. ती मुलगी अल्पवयीन आहे. ते सह-कलाकार होते. तो तिच्यावर दबाव टाकत होता, असे त्या मुलीने सांगितले. तो दहिसरमध्ये राहतो आणि घाटकोपरला येत असे. तिने त्याला ब्लॉक केल्यानंतरही तो तिला फोन करत राहिला.”
रोहितने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘हर मुश्किल का हल अकबर बिरबल’, ‘यम हैं हम’ आणि ‘तमन्ना’ यांसारख्या मालिकांमधील छोट्या भूमिकांमधून केली. त्यानंतर तो ‘ये उन दिनों की बात है’, ‘चंद्रगुप्त मौर्य’ आणि ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसला. ‘काशीबाई बाजीराव बल्लाल’मध्ये बाजीरावची भूमिका साकारून त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तो ‘पांड्या स्टोअर’ या दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक मालिकेत धवल मकवानाच्या भूमिकेत दिसला. रोहित चंडेलला अलीकडेच ‘सैराब’ या रोमँटिक मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. असे म्हटले जात आहे की या मालिकेतून या अभिनेत्याला बदलले जाईल..


COMMENTS