NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट' | CrimeNama
Loading ...

NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'

  NHM मध्ये १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सुमारे १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समकक्ष वेतनश्रेणीतील नवीन...

 


NHM मध्ये १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सुमारे १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


समकक्ष वेतनश्रेणीतील नवीन अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहेया निर्णयासाठी वार्षिक १५३.६० कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय काढण्यात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यानुसार मंगळवारी शासन निर्णय घेण्यात आला. याआधी १४ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार १० वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा निर्णय घेण्यात आला होता.


Petrol Price India: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?.त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी या निर्णयात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी निकष निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि २५ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर मंगळवार ३० जून रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला.


या शासन निर्णयानुसार २५ जून २०२६ या मंत्रिमंडळ बैठकीच्या दिनांकापर्यंत तांत्रिक खंड वगळत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या १४,०१०कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात येईल. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील नियमित मंजूर पदांशी संबंधित कंत्राटी पदांची समकक्षता निश्चित करण्यात येणार आहे. यासह इतर विभागांतील समकक्ष पदांचाही विचार केला जाणार आहे.


PPF Interest Rate 2026: गुड न्यूज! PPF पासून ते सुकन्या समृद्धीपर्यंत..., सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर केला मोठा बदल

कर्मचाऱ्यांना पगार आणि का सुविधा मिळतील?या कर्मचाऱ्यांचा पगाराबाबतही सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. पदांची समकक्षता निश्चित करताना संबंधित पदाचे कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता, सेवा प्रवेश नियम, सध्याचे मानधन आणि सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेली वेतनश्रेणी यांचा विचार केला जाईल. वित्त विभागाची आवश्यक मान्यता घेतल्यानंतर संबंधित विभागांकडून अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.


या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाच्या वेतनश्रेणीतील किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता देण्यात येईल. यासह सध्या मिळत असलेले वेतन संरक्षित राहील. मात्र, या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या लागू असलेल्या रजाच त्यांना मिळतील.


संबंधित पदांवर नवी नियुक्ती नाही


शासन निर्णयात अधिसंख्य पदे ही व्यक्तीसापेक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा अन्य कारणांनी सेवा संपुष्टात आल्यानंतर ती पदे आपोआप रद्द होतील आणि त्या पदांवर नवीन नियुक्ती करता येणार नाही. यासह या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीही मिळणार नाही.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'
NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhggox5Q-Lqo9W5jTb8ai8i1oXvf7MA3V_ytOj4VWY-KUbKkx2vY-mImKCNyyTFRQD48tNHtc6e0lVY6H7abrEcxeKQt3-BhRKIB42YHF-wjBuYcCWodae-UTUwDZc_35PnFv_ZpuJXwGWE-6bQEbCIHCYW2PRF3LVESbLzNANIJP1silyrQyNAHu7-CVY/s320/IMG_20260701_161626.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhggox5Q-Lqo9W5jTb8ai8i1oXvf7MA3V_ytOj4VWY-KUbKkx2vY-mImKCNyyTFRQD48tNHtc6e0lVY6H7abrEcxeKQt3-BhRKIB42YHF-wjBuYcCWodae-UTUwDZc_35PnFv_ZpuJXwGWE-6bQEbCIHCYW2PRF3LVESbLzNANIJP1silyrQyNAHu7-CVY/s72-c/IMG_20260701_161626.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/nhm-10-15.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/nhm-10-15.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content