लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने काही महिन्यांपूर्वी मुंबईत हक्काचं घर घेतलं. सी-लिंकचा व्ह्यू असलेल्या या घराचा एक व्हिडीओ मीरा...
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने काही महिन्यांपूर्वी मुंबईत हक्काचं घर घेतलं. सी-लिंकचा व्ह्यू असलेल्या या घराचा एक व्हिडीओ मीराने 'नजर इज रियल' म्हणत शेअर केला आहे.मीराने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 'गेले तीन दिवस हे असंच चालू आहे, आता मी थकलेय,' असं व्हिडीओत मीराने म्हटलंय. तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
मीरा जगन्नाथ हिने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत नवीन घर विकत घेतलं. तिने कुटुंबरोबर २५ जून रोजी गृहप्रवेश केला. मीराला नवीन घरात राहायला जाऊन दोन आठवडेही झाले नाहीत, तर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने 'नजर इज रियल' असं म्हटलंय. तर झालं असं की मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा फटका मीराच्या नवीन घरालाही बसला आणि सी लिंकचा व्ह्यू असलेल्या या घरात पावसाचं पाणी शिरलंय.पाहा मीरा जगन्नाथच्या घरातील व्हिडीओ
मीरा जगन्नाथने शेअर केलेल्या व्हिडीओत एसीजवळून तिच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी पडताना दिसतंय आणि मीरा ते पाणी पुसत आहे. व्हिडीओमध्ये मीरा म्हणाली, "हा एवढा मोठा धबधबा पाहायला इतका खर्च केला. सातासमुद्रापार कॅनडाला जाऊन आले. पण असाच धबधबा माझ्या घरात आहे. वॉव. गेले तीन दिवस हे असंच चालू आहे. मी दिवसभर बाहेर असते, काम करते, थकून येते आणि हे सगळं पाहून साफसफाई करते. म्हणजे मिसिंग लिंक पण एका रात्रीच चालू झाली, पण माझ्या घरातलं पाणी काही संपत नाहीये. मी आता खरंच थकलेय. मला खरंच कळत नाहीये की नजर आहे, पाऊस आहे की नक्की काय आहे."दरम्यान, मुंबईत जवळपास एका आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर लोकांच्या घरातही पाणी शिरतंय. मीरा जगन्नाथच्या घरातही पावसाचं पाणी शिरलंय. मुंबई-पुणे मिसिंग लिंक दरड कोसळल्याने बंद झाली होती, त्याचा उल्लेख करत तिने त्रागा व्यक्त केला आहे.


COMMENTS