Maharashtra Weather Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्र...
Maharashtra Weather Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील 9 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता हवामानात बदल होत असून पुढील 24 तासांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुणे-सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट लागू आहे. इतर भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


COMMENTS