Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात | CrimeNama
Loading ...

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात

  Maharashtra Rain Weather Updates मुंबई : महाराष्ट्रभरातील बहुतांश भागात सध्या मान्सूनने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र सध्या बघायला मिळतआहे....

 


Maharashtra Rain Weather Updates मुंबई : महाराष्ट्रभरातील बहुतांश भागात सध्या मान्सूनने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र सध्या बघायला मिळतआहे. अशातच गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाचे तांडव सुरू सुरु असून जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे . सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत.

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे, तर ठाणे आणि मुंबई परिसरात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तरदुसरीकडेआज नाशिक जिल्ह्यासह त्रंबकेश्वर, इगतपुरी आणिलगतच्या तालुक्यांमध्येपावसाचीसंततधारकायमअसल्याचेचित्रआहे. तरपुढीलकाहीतासात ढगफुटीसदृश्य पावसाचाअंदाजपडण्याचीशक्यताअसूनहवामानविभागानेनाशिकजिल्ह्याला रेड अलर्ट जारीकेलाआहे. एकंदरीतराज्यातसध्याकायपरिस्थितीआहेयाबाबतअधिकमाहितीजाणूनघेऊ (Weather Rain Alert Maharashtra)


Weather Alert Maharashtra: हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा


भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात 7 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी या पाच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असून डोंगरदऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर दुसरीकडे कोकण विभागात देखील पावसाचा जोरकायमआहे. आज पालघर, रायगड या दोन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तिकडे ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे.


दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.


Mumbai Rain: मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम, मिठी नदी पूर्णतःभरली


दरम्यान, मुंबईत सतत पडत असलेल्या पावसाच्या सरींनी सध्या विश्रांती घेतलेली बघायला मिळत आहे. तर आजही मुंबईला ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायमअसेल, असे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाऊस थांबला असला तरीही पावसाचे ढग दाटलेले आहेत. अशातच मिठी नदी पूर्णत: भरलेली पाह्यला मिळत आहे.

Malegaon Rain: गिरणा नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..


चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून सुरू आलेल्या पावसामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत असून असून नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला सध्या पूर आल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे. मध्यरात्री उशिरा गिरणा नदी प्रवाहित होऊन वाहू लागल्याने नदी पात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाण्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ होणार आहे. दरम्यान, मालेगाव शहर व परिसरात अद्यापही पाहिजे तितका पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे.


Kolhapur Rain: पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहचली 35 फुटांवर; नदीची इशारा पातळीकडे वाटचाल


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली असून आता ही नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पात्रा बाहेर पडलेल्या आणि आजूबाजूच्या शेतात पसरत असलेल्या पंचगंगा नदीची कोल्हापुरातील शिवाजी पूल परिसरातील पाण्यामुळे नदीचे रौद्ररूप स्पष्ट दिसत आहे.


Beed Rain: बीड जिल्ह्यात सरासरीच्या 24 टक्के पावसाची नोंद; मागील 24 तासात 2.9 मिलिमीटर पाऊस


यंदा बीड जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 24% इतक्या पावसाची नोंद झालीय. मागील दोन दिवसांसाठी जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला होता. मात्र केवळ ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस बरसला. त्यामुळे आजही बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे. वार्षिक सरासरीच्या 24 टक्के पावसाची नोंद झाली असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2.9 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. तर जून पासून आत्तापर्यंत एकूण 135.8 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये यादरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. जिल्ह्यात केज तालुक्यात सर्वाधिक 244.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी पाऊस हा आष्टी तालुक्यात झाला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्याला हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट नाही. मात्र हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Igatpuri Rain : इगतपुरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार


इगतपुरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका शेतीला बसला असून अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. दरम्यान, आज इगतपुरी, नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


Gondia Rain: गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील पिपरिया-रिसेवाडा मार्गावरील नदीच्या पुरात टिप्परसह अनेक वाहने अडकली


गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सालेकसा, आमगाव व देवरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः सालेकसा तालुक्यातील विविध नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सालेकसा तालुक्यातील पिपरिया-रिसेवाडा मार्गावरील नदीमध्ये सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान एक टिप्पर तसेच काही इतर वाहने अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रात अडकून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नदी नाले हे दुथळी भरून वाहत असून प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Mumbai: मुंबईला पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट


मुंबईला पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सकाळी 7 वाजता जारी केलेल्या नाऊकास्ट इशाऱ्यानुसार, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरीही मुंबई वर पावसाच्या ढगांचे सावट पाह्यला मिळत आहे, तर समुद्रात ही भरती असून हलक्या लाटा आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4975,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1857,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,501,India,1040,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,37,Lifestyle,397,Maharashtra,2198,Mumbai,545,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2104,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6sQpek94rQ9p3X92bGvDHCeyTJOl3m2jEY90IjmY_fWFx2Lhu5UElJG9NGS0BSpNC5-sblx-hFmHGklh48RYxBx5SP0x7bdTSFlFkg6BlSXr1pF4qF1PvPVBVBwKcWO-xdvcuGQc9ypKT2LN0C1VqXtECKmMEAsvICDsX-Mg2gSDNAQ3X5fOaWA0XonQ/s320/n7187010181783415244091a9510a79dfd8878df5bfea44cdeac90b9d8fac16dfd16051981a29eeaeaddaa4.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6sQpek94rQ9p3X92bGvDHCeyTJOl3m2jEY90IjmY_fWFx2Lhu5UElJG9NGS0BSpNC5-sblx-hFmHGklh48RYxBx5SP0x7bdTSFlFkg6BlSXr1pF4qF1PvPVBVBwKcWO-xdvcuGQc9ypKT2LN0C1VqXtECKmMEAsvICDsX-Mg2gSDNAQ3X5fOaWA0XonQ/s72-c/n7187010181783415244091a9510a79dfd8878df5bfea44cdeac90b9d8fac16dfd16051981a29eeaeaddaa4.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/maharashtra-rain-alert.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/maharashtra-rain-alert.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content