1. मुंबई:आझाद मैदानात पाच हजारांहून अधिक शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 2. छत्रपती संभाजीन...
1. मुंबई:आझाद मैदानात पाच हजारांहून अधिक शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
2. छत्रपती संभाजीनगर: चिमुकल्याने गिळली जीवघेणी वस्तू, 3 टेस्ट फेल, चौथ्यात सापडलं कारण, 7 महिन्याच्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर.
3. महाडीबीटी पोर्टल ठप्प; तब्बल 72 सरकारी योजनांचे अर्ज रखडले,
4. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय.
5. पुणे-मुंबई प्रवास आजही अनिश्चित! १७ जुलैपर्यंत ३० रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांची गैरसोय कायम.
6. नवी दिल्ली: सर्वसामान्यांना मोठा दिलासा.. सरकारने निश्चित केल्या 39 अत्यावश्यक औषधांच्या किंमती, बीपीपासून डायबेटीजपर्यंतच्या औषधांचा समावेश.
7. निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका"; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत आमदाराच्या प्रश्नावर मंत्री झिरवाळांनी विधानसभेत दिले उत्तर .
8. नागपूर: "काम करून घेता, आठ महिने पगार देत नाही"; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
9. अंधेरी : अंधेरीत भरधाव बेस्टची अनेक वाहनांना धडक, जवळपास १४ गाड्या एकमेकांवर आदळल्या.
10. मानवत : सकाळी अध्यापन, दुपारी मतदार पुनर्निरीक्षण, रात्री ऑनलाइन काम : कामाच्या ताणाने BLO शिक्षक हैराण.


COMMENTS