Indian Doctor: 'ते' मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका | CrimeNama
Loading ...

Indian Doctor: 'ते' मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका

  वॉशिंग्टन: अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह टेस्ला कार जाणूनबुजून २५० फूट खोल दरीत पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरला न्यायाल...

 


वॉशिंग्टन: अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह टेस्ला कार जाणूनबुजून २५० फूट खोल दरीत पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरला न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. डॉक्टर धर्मेश पटेलची (४५) सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.डॉक्टर पटेल विरोधात हत्येचा खटला सुरू होता. पण २ वर्षे त्याचं मानसिक समुपदेशन सुरू होतं. समुपदेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं न्यायालयानं पटेलला दिलासा दिला. पटेलला आरोपमुक्त करण्यात आलं आहे. पटेलनं पत्नी आणि दोन मुलांसह प्रवास करताना त्याची कार दरीत पाडली होती.


नेमकं प्रकरण काय?

२ जानेवारी २०२३ रोजी धर्मेश पटेल त्याची पत्नी आणि दोन मुलांसह कारनं फिरायला गेला होता. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये त्यानं स्वत:ची टेस्ला कार २५० फूट खोल दरीत पाडली. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या उंचीवरुन कार पडल्यानंतरही कारमधील चारही जण वाचले. त्यांना अतिशय किरकोळ जखमा झाल्या. हा एक चमत्कार मानला गेला.


पतीनं जाणुनबुजून कार दरीत पाडल्याचा जबाब धर्मेशच्या पत्नीनं पोलीस चौकशीत दिला होता. यानंतर पोलिसांनी पटेलला अटक केली. हत्येच्या प्रयत्नाचे तीन आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. पण त्यानंतर पतीची भूमिका बदलली. पतीवर खटला चालावा असं वाटत नाही, अशी भूमिका पत्नीनं घेतली आणि संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं.


या प्रकरणाचा तपास सुरू असताना पटेल यांचं समुपदेशन सुरू झालं. गंभीर स्वरुपाच्या तणावाचा सामना करत असल्याचं पटेलनं मानसोपचारतज्ज्ञांना सांगितलं. अपहरणकर्ते येतील आणि माझ्या मुलांना नेतील. मग त्यांना विकून टाकतील, असा भ्रम पटेलला झाला होता, अशी माहिती समुपदेशनातून समोर आली.


मुलांचं अपहरण होईल या भीतीनं पटेलचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यातूनच त्यानं कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर कॅलिफोर्नियाच्या वैद्यकीय बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेत पटेलला प्रॅक्टिस करण्यास मज्जाव केला होता. जवळपास वर्षभर पटेल तुरुंगात होता.


डॉ. पटेल आरोपमुक्त कसा झाला?

धर्मेश पटेल अतिशय तणावात होता. त्याला गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार झाल्याचं तज्ज्ञ डॉक्टर मार्क पॅटरसन यांनी २०२४ मध्ये न्यायालयाला सांगितलं. यानंतर न्यायालयानं त्याची तुरुंगातून सुटका केली. मानसिक आरोग्यासाठी आवश्यक उपचार पूर्ण करण्यासाठी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.


सॅन मेटो काऊंटीचे डिस्ट्रिक्ट वकील स्टिव्ह वॅगस्टाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यातील तरतुदींमुळे न्यायाधीशांना आरोप हटवावे लागले. कोणी मानसिक आजारामुळे असं केल्यास आणि न्यायालयानं निश्चित केलेले उपचार पूर्ण घेतल्यास २ वर्षांनंतर त्याच्यावरील आरोप हटवले जातात.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4835,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1771,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,963,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2142,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Indian Doctor: 'ते' मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका
Indian Doctor: 'ते' मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmnqI_XqhMutRRGPyj3Ccz9wJPI6bXQL8I_aeMrhZYC1cx6lid0nOSPAXF1XRxxITu-9XKL8iexYTWhLOmq8FD9KfBqFBweS8oJ1goxmod7PPp2JtTexcnQKEOail5zBJfyhwsjnmHWeXDnpKNN__LRPuX4p4HT1hZe5LT6TfJBIEPgp5Yjem-w4jymdc/s320/IMG_20260709_162455.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmnqI_XqhMutRRGPyj3Ccz9wJPI6bXQL8I_aeMrhZYC1cx6lid0nOSPAXF1XRxxITu-9XKL8iexYTWhLOmq8FD9KfBqFBweS8oJ1goxmod7PPp2JtTexcnQKEOail5zBJfyhwsjnmHWeXDnpKNN__LRPuX4p4HT1hZe5LT6TfJBIEPgp5Yjem-w4jymdc/s72-c/IMG_20260709_162455.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/indian-doctor-250-3.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/indian-doctor-250-3.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content