Drishyam 3 Movie : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम' हा क्राइम थ्रिलर चित्रपट २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या...
Drishyam 3 Movie : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम' हा क्राइम थ्रिलर चित्रपट २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर 'दृश्यम'चा दुसरा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित झाला.
‘दृश्यम'च्या दोन्ही भागांना मिळालेल्या यशानंतर आता या सिनेमाचा तिसरा भाग रिलीज होणार आहे. Drishyam 3 हा बहुचर्चित चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होईल.
Drishyam 3 बद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता नेमकं काय दाखवणार, सिनेमाचा स्क्रीनप्ले कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याचबद्दल गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांनी ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘दृश्यम ३’बद्दल कमलेश सावंत यांनी काही खुलासे केले आहेत. ते म्हणाले, “दृश्यम ३’ सिनेमाचा स्क्रीनप्ले हा पूर्णपणे वेगळा आहे. पहिल्या दोन भागांचा स्क्रीनप्ले हा मल्याळमप्रमाणे होता. पण, या तिसऱ्या भागात बदल करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या भागात तुम्हाला जयदीप अहलावत, प्रकाशराज सर पाहायला मिळतील. आधी अहलावत सर वकिलाची भूमिका साकारणार होते पण, नंतर अक्षय खन्नाचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता त्याची भूमिका अहलावत सर साकारणार आहेत. ओव्हरऑल सांगायचं झालं तर, सिनेमा खूप छान बनलाय.”“माझा एक सीन आहे…जिथे पाच दिवस सगळे लोक मला मारत होते. सगळं पब्लिक मला मारतंय असा तो एक सीन आहे. दृश्यमच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिलं असेल…सगळे लोक शेवटी मला मारतात. पण, आता तिसऱ्या भागात पब्लिक मध्येच मला मारतंय असा एक सीन आहे. तो सीन आता नेमका कसा आहे ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेल. मला खूप मारलं…जोगेश्वरीच्या मैदानात. पण, अर्थात सगळी काळजी घेऊन फाइट मास्टर सगळं करतात. त्यामुळे मला काहीच त्रास झाला नाही… असे सगळे इंटरेस्टिंग सीन्स आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे आता प्रेक्षकांच्या मनात सुद्धा ‘दृश्यम ३’बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.” असं कमलेश सावंत यांनी सांगितलं.दरम्यान, अक्षय खन्नाने शूटिंग सुरू होण्यापूर्वीच ‘दृश्यम ३’मधून माघार घेतली होती. त्याने दुसऱ्या भागात IG तरुण अहलावतची भूमिका साकारली होती. अक्षयचे फॅन्स त्याला आता तिसऱ्या भागात खूप मिस करणार आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होईल.


COMMENTS