मुंबईतील साकिनाका येथे एका इसमाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आता या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मुंबईत...
मुंबईतील साकिनाका येथे एका इसमाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आता या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरू असून मुंबईतील अंधेरी सबवेखाली पाणी साचलं आहे.रात्रभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवे भरला आहे. मुंबईत पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते. दरम्यान या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता आहे. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते.मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांची कसरत होतेय.काय घडलं नेमकं?
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुपारी 12.26 वाजता या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचे झाकण उघडले होते. तीन कर्मचारी आणि एक वाहन इथे होते. याचवेळी मोबाईल फोनवर बोलत असलेली एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ मॅनहोलमध्ये शिडी उतरवून शोध सुरू केला. मात्र त्यांना त्या व्यक्तीची केवळ छत्री आणि चप्पल सापडली. मॅनहोलमधील पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने संबंधित व्यक्ती कोणत्या दिशेने वाहून गेली, हे सुरुवातीला स्पष्ट होऊ शकले नाही. यानंतर मुंबई अग्निशमन दलाने (MFB) शोधमोहीम सुरू केली. दुपारी 2.15 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा मृतदेह दिसून आला असून अग्निशमन दलाचे जवान तो बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.


COMMENTS