पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवला...कालपर्यंत डॉक्टरांच्या पाया पडणारा त्यांच्याच जीवावर उठला! नगरसेवक म्हात्रेंचा काळा इतिहास समोर | CrimeNama
Loading ...

पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवला...कालपर्यंत डॉक्टरांच्या पाया पडणारा त्यांच्याच जीवावर उठला! नगरसेवक म्हात्रेंचा काळा इतिहास समोर

  डोंबिवली: ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी दोनवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून जीवदान दिले, त्याच क्षेत्रातील डॉक्टरांना अश्लील शिव...

 


डोंबिवली: ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी दोनवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून जीवदान दिले, त्याच क्षेत्रातील डॉक्टरांना अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश ऊर्फ सुकऱ्या म्हात्रे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.या धक्कादायक प्रकरणाचा आणि म्हात्रेंच्या भूतकाळातील एका अजब विरोधाभासाची सध्या संपूर्ण ठाण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. डॉक्टर आणि नर्सेसला मारहाण केल्याचा आरोप नगरसेवक म्हात्रे यांच्यावर आहे.

शर्टच्या खिशातील पेनाने वाचवला होता जीव!



हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रमेश म्हात्रे यांच्यावर २००८ मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली खरी, पण ती पोटात घुसली होती. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकेच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रे यांची किडनी निकामी झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना जीवदान दिले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर कृतज्ञतेपोटी थेट पाया पडणारे 'बाहुबली' म्हात्रे आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्यामुळे तुरुंगवासाच्या उंबरठ्यावर आहेत.धक्का सहन न झाल्याने डॉक्टरांचे राजीनामे



रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात केलेल्या शिवीगाळ आणि मारहाणीचा धक्का सहन न झाल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंके यांनी तडकाफडकी आपले राजीनामे दिले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयातून थेट कल्याण कोर्टात रवानगी?



अटक होईल या भीतीने म्हात्रे उच्च रक्तदाब व इतर त्रासाचे कारण देत कळवा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्या सुनावणीला ते ऑनलाईन हजर राहिले होते. मात्र, आता न्यायालयाने त्यांना 'प्रत्यक्ष' हजर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच म्हात्रेंना थेट कल्याण कोर्टात नेले जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर त्यांना आज डिस्चार्ज देतात की म्हात्रेंचा रुग्णालयातील मुक्काम वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांनी नगरसेवक म्हात्रे यांच्याविरोधात काळ्या फिती बांधून उपचार केले.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4870,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1785,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,499,India,980,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,383,Maharashtra,2158,Mumbai,542,Nagpur,77,Nashik,85,Politics,761,Politics.,8,Pune,2074,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवला...कालपर्यंत डॉक्टरांच्या पाया पडणारा त्यांच्याच जीवावर उठला! नगरसेवक म्हात्रेंचा काळा इतिहास समोर
पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवला...कालपर्यंत डॉक्टरांच्या पाया पडणारा त्यांच्याच जीवावर उठला! नगरसेवक म्हात्रेंचा काळा इतिहास समोर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioxTaU_z2yhox2HZF0neeKDx2dstGUHmT7cbyOT2c8T8E5HEVQg-0ZhPf7U5kuwFo_3MzdE4ycRjz0RtiuFwEww7qQsRf55XpGIqdHYG9w-GtUP_r97dVANUrNUNlceu_Kt2WbolepAZZOOjWiAthjElTYxk_WDick92ncf23ch5lG1DKG5nKyemSfm8A/s320/n71907609617836624817145a3cbc12d7bced0c86030b227b8044f50ecc81ca5fe9292741792d2c6a2c0d14.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioxTaU_z2yhox2HZF0neeKDx2dstGUHmT7cbyOT2c8T8E5HEVQg-0ZhPf7U5kuwFo_3MzdE4ycRjz0RtiuFwEww7qQsRf55XpGIqdHYG9w-GtUP_r97dVANUrNUNlceu_Kt2WbolepAZZOOjWiAthjElTYxk_WDick92ncf23ch5lG1DKG5nKyemSfm8A/s72-c/n71907609617836624817145a3cbc12d7bced0c86030b227b8044f50ecc81ca5fe9292741792d2c6a2c0d14.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_961.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_961.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content