मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये थरार,'तू मला नापास केलं' म्हणत विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला | CrimeNama
Loading ...

मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये थरार,'तू मला नापास केलं' म्हणत विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला

  छत्रपती संभाजीनगर: शहरवासीयांचा काळजाचा ठोका चुकवणारी आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक गुन्हेगारी घट...

 


छत्रपती संभाजीनगर: शहरवासीयांचा काळजाचा ठोका चुकवणारी आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. छावणी परिसरातील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्येच आपल्या वर्ग शिक्षकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला.या भीषण आणि अनपेक्षित हल्ल्यात संबंधित शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा हल्ला करण्यासाठी विद्यार्थ्याने ऑनलाईन साईटवरून चाकू मागवला होता, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.


टीसी मागण्यासाठी आला आणि थेट वर्गशिक्षकालाच बनवले लक्ष्य

या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेची सविस्तर हकिगत अशी की, शाळेच्या मुख्याध्यापिका या मंगळवारी ३० जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिस केबिनमध्ये काम करत होत्या. याच वेळी शाळेचा ९ वीचा एक विद्यार्थी तिथे आला आणि त्याने आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केली. मुख्याध्यापिकेने त्याला रीतसर अर्ज करून फी भरण्यास सांगितले असता, त्याने अर्ज देण्यास नकार दिला. वाद वाढल्याने मुख्याध्यापिकेने त्याच्या वर्गशिक्षकास केबिनमध्ये बोलावून घेतले.


"तुला सोडणार नाही!"; मराठीच्या शिक्षकावर विज्ञानात नापास केल्याचा ठेवला आक्षेप

वर्गशिक्षक केबिनमध्ये येताच प्रत्युष त्यांच्यावर प्रचंड भडकला आणि त्याने आरडाओरड सुरू केली. "सरांनी मला मुद्दामहून नववीच्या विज्ञान आणि गणित विषयात नापास केले, ज्यामुळे माझे एक वर्ष वाया गेले," असा आरोप त्याने केला. विशेष म्हणजे, वर्गशिक्षक हे शाळेत केवळ मराठी आणि हिंदी विषय शिकवतात, त्यांचा विज्ञान किंवा गणित परीक्षेच्या निकालाशी कोणताही संबंध नव्हता. मुख्याध्यापिकेने त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र डोक्यात भूत शिरलेल्या विद्यार्थ्याने "मी तुला जिवंत सोडणार नाही, तुझा गेम करतो," अशी उघड धमकी देत कमरेला खोचलेला चाकू बाहेर काढला.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,5075,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1919,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1096,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,414,Maharashtra,2240,Mumbai,552,Nagpur,80,Nashik,85,Politics,765,Politics.,8,Pune,2132,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,55,Sport,80,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये थरार,'तू मला नापास केलं' म्हणत विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला
मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये थरार,'तू मला नापास केलं' म्हणत विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxJ7eVs1yCocVG98885opQ6zL5McPpkpOawjHpFNADHzlHzILorsQqXsexPsyJMWw5iHnk-9KGaPTRjzZGlbGIBRtmreAeIFfOeUrTzMXWsR9WBRU0cAj-M711v-bY6XGnjZDlqGUfS0i_I7p2RlYa9P8NrswGhsaHJoiviJ_HTHTM-xAgZLlTimTs9G0/s320/IMG_20260701_150639.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxJ7eVs1yCocVG98885opQ6zL5McPpkpOawjHpFNADHzlHzILorsQqXsexPsyJMWw5iHnk-9KGaPTRjzZGlbGIBRtmreAeIFfOeUrTzMXWsR9WBRU0cAj-M711v-bY6XGnjZDlqGUfS0i_I7p2RlYa9P8NrswGhsaHJoiviJ_HTHTM-xAgZLlTimTs9G0/s72-c/IMG_20260701_150639.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_96.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_96.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content